दिनांक २६ मार्च,श्रीगोंदा:
श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्यात झुम अप्लिकेशनच्या माध्यमातून ऑनलाईन घेण्यात आलेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कारखान्याच्या सभासदांना तसेच तालुक्यातील ज्येष्ठ राजकारणी, पदाधिकारी व सक्रीय कार्यकर्त्यांना विचारात न घेता, बैठक पार पाडणे चुकीचे असल्याचे मत घनश्याम आण्णा शेलार यांनी श्रीगोंदा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुका पुढे असतांना अशा पद्धतीने वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने घेणे, कोरोना प्रादुर्भावाचे निमित्त करून, आगामी निवडणुकांवर असे भाष्य केले गेले. अशी चर्चा व्हायला नको होती. असे मत शेलार यांनी पत्रकार परिषदेमध्ये नमूद केले. काल झालेल्या बैठकीत स्वतः मला कारखान्याचा सभासद, माजी संचालक तसेच राज्य साखर संघाचा संचालक या नात्याने आमंत्रित न करता डावलने चुकीचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या पन्नास लोकांच्या बैठकीमध्ये कोणत्या लोकांना निमंत्रित करायचे ? याचे नियोजन कारखाना प्रशासनाने करणे गरजेचे होते. पन्नास लोकांच्या नियोजनामध्ये २२ संचालक, आवश्यक अधिकारी, तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी, लोक प्रतिनिधी, माजी आमदार, राज्य साखर संघाचा संचालक म्हणून मला, जिल्हा बँकेच्या संचालक राहुल (दादा) जगताप यांना न बोलावता सदर बैठक पार पडली. याबाबत कार्यकारी संचालकांना घनश्याम (आण्णा) शेलार यांनी विचारणा केली. त्यांनी कलेक्टरचे निर्देश सांगितले. कोणते पन्नास लोक बोलवायचे ? याची यादी ही त्यांनी दिली का ? असा सवाल यावेळी कार्यकारी संचालकांना केला. तर, कार्यकारी संचालक हे कारखान्याच्या चेअरमनच्या घरचे नोकर असल्यासारखे काम करत आहेत. असा आरोप आज पत्रकार परिषदेत बोलतांना घनश्याम अण्णा शेलार यांनी केला
कोरोनाची नियमावली दाखवणाऱ्या कारखान्याने सर्व सभासदांना सह्यासाठी बोलवले होते. २२,००० सभासदांनी सह्यांसाठी एका ठिकाणी उपस्थिती दाखवली असती तर ? कोरोनाचे नियम पाळले गेले असते का ? असा सवाल या निमित्ताने शेलारांनी उपस्थित केला. सभासदांना लिंक देणे गरजेचे होते. मला स्वतः लिंक उपलब्ध करुन बैठकीत सहभागी होण्यासाठी धडपड करावी लागली. त्यासाठी वेगवेगळ्या स्त्रोतांचा वापर केला. अशा पद्धतीचे राजकारण करणारा कारखाना राज्यात दुसरा कोणता नसेल. घाणेरडे राजकारण कारखाना करत असल्याबाबत त्यांनी या वेळेस नमूद केले.
यानंतर अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेत कालच्या कारखान्याच्या सर्वसाधारण सभेच्या बैठकीमध्ये उपस्थित असतांना कारखान्याचे चेअरमन यांनी कारखाना बिनविरुद्ध करण्याची संकल्पना मांडली. कारखाना बिनविरोध करण्याला कोणाचा विरोध नसून? कारखान्यातील कारभार पारदर्शक व्हायला हवा. असे मत या वेळेस अण्णा शेलार यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील अनेक कारखाने बिनविरोध झाल्याबाबत बोलतांना, कारखान्याचे चेअरमन, संचालक, व्हाईस चेअरमन यांच्यामध्ये समन्वय आणि कारभारात सुसूत्रता असल्याने ते कारखाने बिनविरोध झाल्याचे त्यांनी नमूद केले. कालची बैठक कारखान्याच्या सभासदांची दिशाभूल करण्यासाठी झूमवर घेण्यात आल्याचे ते म्हणाले. पुढे बोलतांना बापूंच्या स्मारकाबाबत तालुक्यातील कोणीही विरोध केला नाही. त्यात झालेल्या गैर कारभाराबाबत याठिकाणी पत्रकार परिषदेत चर्चा करण्यात आली. या सर्व गोष्टींचा उहापोह होऊ नये. म्हणून, सदर वार्षिक सर्वसाधारण सभेची बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. बापूंच्या नावाने हॉस्पिटल निर्माण करण्यात येणार असून, त्याबाबत ही चर्चा या ठिकाणी करण्यात आली. कारखाना तयार करणार असलेल्या हॉस्पिटल कारखान्याच्या नियंत्रणात पारदर्शक पद्धतीने निर्माण होत असेल. तर, अडचण नाही. अंधारात चालणाऱ्या कारभारास आमचा विरोध असून, श्रीगोंदा सहकारी साखर कारखाना बिनविरोध करण्यासाठी खाजगी कारखानदार नकोत, अशी भूमिका यावेळी अण्णा शेलार यांनी मांडली.
Corruption and neglect of sugar production, raw sugar, steel purchase, scrap sale, co-generation (power generation) … Complaints will be lodged with the Commissioner of Co-operation: Ghanshyam (Anna) Shelar ..
यानंतर कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन केशव भाऊ मगर यांनी आपली भूमिका व्यक्त केली. त्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले की, साखर उत्पादन, रॉ साखर, स्टील खरेदी, भंगार विक्री, को-जन वीजनिर्मिती या सर्व प्रक्रियेमध्ये वारंवार भ्रष्ट्राचार होत आला आहे. कारखाना तोट्यात, कोरोनाचे सावट, कारखान्यातील भ्रष्टाचार, गैरकारभार याबाबत बोलण्याची वेळ आली असतांना, ऑनलाइन झुमच्या माध्यमांतून सर्वसाधारण सभा घेणे सोयीचे ठरले नाही. कारखान्यातील कामगारांची उपेक्षा होत असताना, कारखान्यात होत असलेला भ्रष्टाचार, गैर कारभारातून होणारा तोटा या सर्व गोष्टी लक्षात घेता. याबाबतीत सहकार आयुक्त आणि निबंधक तसेच राज्य साखर आयुक्तांकडे तक्रार करणार असलेबाबत केशव भाऊ मगर, घनश्याम (आण्णा) शेलार व अण्णासाहेब शेलार यांनी भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेमध्ये जिजा बापू रोडे हेही उपस्थित होते.
स्रोत:(पत्रकार परिषद)
