‘नागवडे’ कारखान्याची ऐतिहासिक ५५ वी वार्षिक सभा ऑनलाइन पार : सभेत २०० सभासदांनी भाग घेतला.

दिनांक २६ मार्च,श्रीगोंदा :

सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याची ५५ वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवार दि.२५ रोजी पार पडली.

https://bit.ly/bspmycityshrigonda

कोविड महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक सभेला प्रतिबंध असल्याने कारखाना व्यवस्थापनाने ऑनलाईन सभेचे आयोजन केले होते. माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सुभाषराव शिंदे यांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. काही तासांच्या ऑनलाइन सभेत मोबाईल मधील झूम ऍपच्या साहाय्याने सभासदांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला. यावेळी काही सभासदांनी कारखान्याच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले तर काही सभासदांनी त्रुटींवर बोट ठेवले. कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र (दादा) नागवडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सभासदांच्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे दिली. व सभेत मांडलेले ठराव मान्य केले.

The historic 55th Annual Meeting of ‘Nagwade’ Factory was held online: 200 members participated in the meeting.

ऑनलाइन सभेत आ. बबनराव पाचपुते, कारखान्याचे उपाध्यक्ष केशवराव मगर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते घनश्याम शेलार, माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर ,जिजाबापू शिंदे व २०० च्या आसपास सभासदांनी भाग घेऊन मते मांडली.आभार प्रा. सुनिल माने यांनी मानले.

सभेची वैशिष्ट्ये:

कारखान्याच्या इतिहासात पहिल्यांदाच सभा ऑनलाईन झाली.दुपार दोन वाजता सभासदांनी मोबाईलवर सभेत भाग घेतला. बरेच सभासद शेतकरी वर्गातील असल्याने काही सभासदांनी पहिल्यांदाच झूमद्वारे सभेत भाग घेतला. काही सभासद निवांत घरी बसून सभा ऐकत होते. यातली काहीच माहिती नसल्याने व एकाचवेळी अनेक जण बोलत असल्याने काहीसा गोंधळ उडाला. कारखान्याचे जवळपास २० हजाराच्या पुढे सभासद आहेत परंतु ऑनलाइन सभेत दोनशे-अडीचशे सभासदांनीच भाग घेतला. काही सभासदांनी गाडीच्या प्रवासात, घरात पंख्याखाली बसून तर काहींनी शेतात काम करताना सभेत सहभाग घेतला.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading