दिनांक ५ जुलै, श्रीगोंदा:
श्रीगोंदा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील एका गावामध्ये विवाहित महिलेवर एका नराधमाने अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. याबाबत या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नमूद इसमावर बलात्कार व जीवे मारण्याची धमकी या कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पीडित महिलेचे पती फॅब्रिकेशनचे काम करतात. तालुक्यातील मांडवगण येथील एका इसमाचे तिच्या पतीकडे फेब्रिकेशनच्या कामानिमित्त सतत येणे जाणे असे. पतीच्या ओळखीने या विवाहित महिलेची ही या इसमाची ओळख झाली.
नेहमीप्रमाणे तो महिलेच्या घरी फोन करून, पती कुठे आहे ? अशी चौकशी करत असे. वारंवार होत असलेल्या फोनद्वारे सदर इसम त्या महिलेला तू तुझ्या पतीला सोडून दे. माझ्या बरोबर रहा. मी तुला कमी पडू देणार नाही. असे बोलत. त्याच्या बोलण्यातून महिलेला शंका उत्पन्न होत होती. मात्र, तिने हा प्रकार तिच्या नवऱ्याला सांगण्याचे धाडस केले नाही.
दरम्यान विवाहितेशी फोनवर झालेल्या बातचीतीचे रेकॉर्डिंग नवऱ्याला ऐकवीन.! अशी धमकी देत. त्याने त्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली.
दिनांक २५ जून रोजी दहा वाजण्याच्या सुमारास नमूद महिलेचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेलेला असतांना, सदरील इसम त्याच्या स्कॉर्पिओ गाडीतुन पीडितेच्या घरी आला. त्या महिलेला माझ्याबरोबर गाडीत बस नाहीतर, मी तुझ्या पती व मुलास मारून टाकीन. अशी धमकी दिली. भीतीपोटी महिला त्याच्या गाडीत बसली.

त्यानंतर त्याने गाडी अहमदनगर ते दौंड रोडवर असलेल्या एका हॉटेलवर थांबवून, त्या महिलेला लॉजवर घेऊन गेला. तुझ्याशी खाजगी बोलायचे म्हणत तिला एका खोलीत नेऊन, त्याने तिच्या अंगाशी लगट करून, पती व मुलास जीवे मारण्याची धमकी दिली व त्या महिलेच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने अत्याचार केला.
सदर घडलेला प्रकार कोणाला सांगितला. तर, मी तुझी समाजात बदनामी करीन. अशी धमकी देऊन, त्याने त्या महिलेला पुन्हा तिच्या घरी आणून सोडले. Shrigonda …# Atrocities on married women ..! Husband will listen to the recording of both on the phone! Threatening, he demanded physical comfort from the woman! She took medication for mental stress.
होणाऱ्या बदनामीला भिऊन, महिलेने दिनांक २ जुलै रोजी मानसिक तणावात औषध प्राशन केले व नंतर, उपचारादरम्यान तिने औषध प्रशान करण्याचे कारण हा प्रकार असल्याचे पती वडीलांना सांगितले.
यानंतर बाळू सोन्याबापु शेळके, मांडवगण या विरुद्ध भादवि कलम ३७६ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्रोत:(दिनांक ४ जुलै २१ रोजी दाखल फिर्याद)
प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

