दिनांक ५ जुलै, श्रीगोंदा:
नातेवाईक आनंदानं लग्नाला उपस्थित होते. पण, त्यांचा हा आनंद फार काळ टिकला नाही. कोरोना संक्रमण काळातील आचारसंहितेमुळे साखरपुडा, हळदी आणि लग्न हे तिन्ही समारंभ एकाच दिवशी आयोजीत करण्यात आले होते.

दरम्यान साखरपुडाही शाही दिमाखात पार पडला. आणि नुकतीच हळदीची तयारी सुरू झाली होती. तितक्यात “वराचे मित्र चांगले नाहीत” म्हणत, नवरी मुलीने लग्नास नकार दिला आणि विवाह स्थळी एकच खळबळ उडाली.

तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका वरासाठी त्याचे मित्र असे विघ्न ठरले आहेत. काष्टीत एका आलिशान हॉटेलमध्ये पाहुण्यांच्या उपस्थितीत दिमाखात साखरपुडा पार पडल्यानंतर, मुलीनं या अजब कारणामुळे लग्नास नकार दिला. अनं श्रीगोंद्यातील नवरदेवाला रिकाम्या हाती परतावं लागलं आहे. Shrigonda .. Navradeva and Varhadi got angry and returned home.! Bride refuses to marry in a royal wedding in Kashti ..!
असं विचित्र कारण देत मुलीनं थेट लग्नाला नकार दिल्याने, श्रीगोंदा येथील रहिवासी असणाऱ्या नवरदेवा सह वऱ्हाडी मंडळींना निराश होऊन घरी परत जावे लागले आहे. नवरदेवासाठी स्वतःचे मित्रच त्याच्या लग्नात विघ्न ठरत लग्न मोडण्यास कारणीभूत झाले आहेत.
स्रोत:(ऑनलाइन न्यूज)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.
