दिनांक ४ जुलै, श्रीगोंदा
श्रीगोंदा तालुक्यातील सामाजिक, राजकीय तसेच शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे प्राध्यापक तुकाराम दरेकर (सर) यांचे आज पुणे येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७० वर्षांचे होते.

शैक्षणिक क्षेत्राबरोबर समाजकारण व राजकारणामध्ये एक स्पष्ट वक्ता म्हणून, दरेकर सर उर्फ नाना यांचे तालुकाभर नाव होते. कोणत्याही सभेमध्ये व कार्यक्रमात ते आपले विचार स्पष्ट मांडत. समाजकारण असो किंवा राजकारण विरोधकांशी ते कधीही विरोधाभासी वृत्तीने राहिले नाहीत. सर्वांशी समानतेने वागत ते राजकारणात सक्रिय राहिले. सुरुवातीला काही वृत्तपत्रातूनही त्यांनी विचारही मांडले आहेत.

नानांच्या निधन बातमीनंतर आज सामाजिक माध्यमांत त्यांच्याबद्दल दुःख व्यक्त केले गेले. काहींनी राजकारणातील चाणक्य हरपला.! तर, काहींनी शैक्षणिक क्षेत्रातील एक तेजस्वी तारा निखळला.! राजकारणातील स्पष्ट वक्त्याचे निधन.! तर, काहींनी सर्वसामान्यांचा नेता गेला.! अशा शब्दांत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली. Death of Prof. Tukaram Darekar, who made great achievements in social, political, educational and journalism.
प्राध्यापक तुकाराम दरेकर ऊर्फ नाना यांच्या पश्चात पत्नी, मुलं, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक तसेच राजकीय, पत्रकारिता क्षेत्रात दुःख व्यक्त केले जात आहे.
स्रोत:(ऑनलाइन न्यूज)

बहुजन समता पत्र वृत्तपत्र परिवाराकडून प्रा.तुकाराम दरेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
