#श्रीगोंदा.. पोलीसांना गुंगारा देवुन तो अनेक वर्षं होता फरार.. !

दिनांक ३ जुलै, श्रीगोंदा:

दिनांक २७ जून २१ रोजी फिर्यादी सौ. रंजना मच्छिंद्र भदे वय ६० वर्षे, रा.शेडगाव ता.श्रीगोंदा यांनी पोलीस स्टेशन श्रीगोंदा येथे फिर्याद दिली. की, दिनांक २५ जून २१ रोजी हे त्यांचे कुटुंबासह घराला कुलुप लावुन बाहेर गावी गेले असता, कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांचे बंद घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करुन, घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ११ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

त्यावरुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होऊन, तपास पोहेकॉ संभाजी शिंदे करत होते. दरम्यान मिळालेल्या माहीतीवरुन सदरचा गुन्हा मोक्यातील फरार आरोपी व त्याच्या साथीदाराने केला असल्याची खात्रीलायक माहीती पोलिसांना मिळाली. त्यावरुन pi रामराव ढिकले यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व अंमलदार यांना कॉबिंग करण्याचे आदेश दिले.

यानंतर शेडगाव ता.श्रीगोंदा व जवळा ता.जामखेड येथे केलेल्या कॉबिंग ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील सराईत आरोपी संतोष उर्फ बंट्या दिलीप काळे वय ३२ वर्षे, रा.जवळा ता.जामखेड ह.रा.गणेशवाडी ता.कर्जत व राहुल भारत चव्हाण वय ३० वर्षे, रा.जवळा ता.जामखेड यास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शेडगाव व जवळा येथुन ताब्यात घेवुन, सखोल विचारपुस केली असता, सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. Shrigonda .. He was absconding for many years by shouting at the police ..!

संतोष उर्फ बंट्या दिलीप काळे याने उरुळी कांचन ता.हवेली जिल्हा पुणे येथे बायपास गेटसमोर श्रीकृष्ण कॉलनी येथे त्याचे साथीदारांसह घालुन ८०,६००/- रु किंमतीचा सोनेचांदी व रोख रक्कम असा मुद्देमाल लुटुन गुन्हा केल्यापासुन फरार होता. त्याचा शोध पुणे पोलीसांनी वारंवार घेतला. परंतु, पोलीसांना गुंगारा देवुन तो सहा वर्षापासुन अद्याप पावेतो फरार होता. सदर आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्यांचेवर लोणी काळभोर, जामखेड, श्रीगोंदा व बारामती पोठात गुन्हे दाखल आहेत.

https://bit.ly/bspmycityshrigonda

सदरची कारवाई (पोलीस अधिक्षक) श्री. मनोज पाटील, (अप्पर पोलीस अधिक्षक) श्री. सौरभकुमार अग्रवाल, (उपविभागीय पोलीस अधिकारी) श्री. अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली (पोलीस निरीक्षक) श्री. रामराव ढिकले, (सपोनि) दिलीप तेजनकर, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ गोकुळ इंगवले, पोकॉ दादा टाके, पोकॉ अमोल कोतकर यांनी केली असुन, सदर गुन्ह्याचा तपास पोहेकॉ संभाजी शिंदे, पो.कॉ अमोल मरकड हे करीत आहेत.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading