#श्रीगोंदा..विवाहितेचा छळ करत नांदवण्यास नकार..पती, सासू, सासरा, दीरावर गुन्हा दाखल..

दिनांक २ जुलै, श्रीगोंदा:

तालुक्यातील रहिवासी असलेल्या एका महिलेने सासरच्या लोकांकडून होणाऱ्या जाचाला, त्रासाला कंटाळून श्रीगोंदा पोलीस स्टेशनला छळवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

२०१८ ला विवाह झालेल्या, या महिलेला लग्नानंतर सर्रास त्रासाला सामोरे जावे लागले. पती पुण्यात नोकरीला असल्याने, सुरुवातीला सहा महिने तिला सासरी गावीच राहावयाचे होते. यावेळी सासरा, सासू हे चारित्र्य संशय घेऊन त्या विवाहितेचा शारीरिक-मानसिक छळ करत असे.

सहा महिन्यानंतर पुण्याला गेलेल्या त्या महिलेला पतीही नीट वागवत नव्हता. तोही दमदाटी, दहशत, जीवे मारण्याच्या धमक्या देत वाद घालत असे. स्वतः महिलेने कामं करून कमवलेले पैसे घरात खर्ची घालत. तर, नवऱ्याने मिळवलेले पैसे तो आई-वडिलांच्या खात्यावर जमा करत.

महिलेला बीएड च्या शिक्षणासाठी लागणारा पैसा देण्यास पतीने नकार दिला व वाद झाल्याने ही महिला तिच्या गावी (माहेरी) निघून गेली. Shrigonda .. refusing to bathe by harassing a married woman

दरम्यान माहे जानेवारी २०२० रोजी मुलीच्या वतीने तिचे मामा,वडील तिच्या सासरच्या लोकांना समजवण्यासाठी गेले. मात्र, त्यांचे काहीही ऐकून न घेतल्याने तेही गावी निघून आले.

यानंतर महिलेच्या वडिलांनी सासरच्या लोकांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने, पीडितेने ‘भरोसा सेल’ अहमदनगर येथे तक्रार केली. तेथे सासरच्या लोकांना चार वेळा बोलावून घेऊन समजवण्यात आले. पण, त्यांच्यावर काही परिणाम झाला नाही.

https://bit.ly/bspmycityshrigonda

नमूद महिला नांदण्यास तयार असतांना देखील सासू – सासरे नकार देत असल्याने या महिलेने सासरे, सासू, पती, दिर यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये भादंवि कलम ४९८(अ), ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.

स्रोत:(दिनांक ३०/०६/२०२१ रोजी दाखल तक्रार)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading