पत्रकारांकडून महावितरणच्या अधिकार्‍याचा निषेध, कायदेशीर कारवाई करण्याची मागणी..

दिनांक १ जुलै, श्रीगोंदा:

वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलेल्या बातमीचा राग अनावर होवून, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या अधिकार्‍यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. याबाबत श्रीगोंदा पत्रकार संघाच्या वतीने निषेध व्यक्त करत सबंधीत अधीकार्‍याविरुद्ध कायदेशी कारवाई करावी. अश्या मागणीचे निवेदन श्रीगोंद्याचे (तहसिलदार) प्रदीप पवार व श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे (पोलिस निरीक्षक) रामराव ढिकले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


या प्रकरणी अधिक माहिती अशी की, दैनिक श्रीगोंदा सिटीझन वृत्रपत्रात दि.२९ जुन पासुन महावितरणच्या गलथान कारभारचा रोखठोक पर्दाभाष करणाऱ्या बातम्या प्रसिद्ध केल्या जात होत्या. या बातम्यांचा राग येवून, वीज वितरण कंपनीचे (उप अभियंता) अधिकारी अनिल गंगाराम चौगुले यांनी दैनिक सिटीझनच्या वृत्तांवर आक्षेप घेत, वृत्तपत्राच्या संपादकावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.


श्रीगोंदा तालुक्यातील विविध सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, बातम्या प्रसारित करणे हे पत्रकारांचे कर्तव्य आहे. त्यानुसार पत्रकार बातम्या प्रकाशित करत असतात. अनेकदा राजकीय बातम्यांचा रोष धरून वृत्तपत्रांवर आरोप प्रत्यारोप होत असतात. तसेच, वाळू तस्करी, गौण खनिज व अवैध व्यवसायांबाबत लिखाण करणे अपरिहार्य असते. याद्वारे अनेकांच्या रोषाला बळी पडून, माध्यम प्रतिनिधीनां निशाणा केला जातो.

अशाच प्रकारे वृत्तपत्र व पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रकरण सर्रास घडत आहेत. त्याचाच हा एक प्रकार आहे. असे निवेदनात म्हटले आहे. Journalists protest against MSEDCL officials, demand legal action.


वीज वितरण कंपनीचे अधिकारी चौगुले यांनी वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीचा राग अनावर होवून, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेचा कार्यक्षेत्रातील सर्व पत्रकार बांधव जाहीर निषेध केला आहे.

यावेळी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते, तालुकाध्यक्ष अंकुश शिंदे, बाळासाहेब काकडे, मिराताई शिंदे, चंदन घोडके, दादा सोनवने, योगेश चंदन, राजेंद्र राऊत, अर्शद शेख, जिल्हा ग्रामिण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सोहेल शेख,अनिल तुपे, दत्ता जगताप, राजु शेख, पीटर रणसिंग, संतोष गोरखे, मुश्ताक पठाण उपस्थित होते.

स्त्रोत:(निवेदन)

https://bit.ly/bspmycityshrigonda

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading