श्रीगोंदयातील तरुणाकडून पोलीस भरतीसाठी बनावट कागदपत्र सादर.. पुण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल..

दिनांक १ जुलै, श्रीगोंदा/पुणे:

राज्य राखीव पोलिस दलाकडून घेण्यात आलेल्या भरतीमध्ये बनावट सही, शिक्के असलेले वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्याने राहूल शिवाजी म्हेत्रे (रा. श्रीगोंदा) व त्याच्या एका साथीदारावर वानवडी, पुणे पोलिस ठाण्यात (भादंवि ४२०) नुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण सखाराम उत्तेकर (वय वर्षे ५७ रा.वाकड) यांनी याबाबत तक्रार दिली आहे.

राज्य राखील पोलिस दल गट क्रमांक २ येथे माहे ऑगस्ट २०१७ मध्ये “सशस्त्र पोलिस शिपाई” या पदासाठी ५० जागांची भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत श्रीगोंदा येथील राहुल म्हेत्रे याचे नाव अंतिम यादीत आले होते. म्हेत्रेला भरतीची संपूर्ण माहिती असतांनाही त्याने नियमबाह्य मेडिकल केले.

म्हेत्रेने दिनांक १६ ऑगस्ट २०१७ रोजी पुण्यातील ससून रुग्णालयात मेडिकल करून बनावट सही व शिक्के असलेले मेडिकल प्रमाणपत्र घेतले, व ते भरतीसाठी सादर केले. यामुळे शासनाची फसवणूक झाली आहे. Young man from Shrigonda submits fake documents for police recruitment .. Fraud case filed in Pune ..

कागदपत्रे पडताळणीमध्ये राहुल म्हेत्रेचे मेडिकल प्रमाणपत्र बनावट असल्याचे दिसून आल्याने, त्याच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

स्रोत:(ऑनलाईन न्यूज)

https://bit.ly/bspmycityshrigonda

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading