#श्रीगोंदा.. BDO प्रशांत काळेंना अश्लील शिवीगाळ करत, शासकीय वाहनातून ओढुन बुटाने हाणमार करण्याचा प्रयत्न.. बाळासाहेब नाहाटावर गुन्हा दाखल..

दिनांक २१ जून, श्रीगोंदा:

तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी तसेच कोविड सेंटरच्या माध्यमांतून पूर्ण तालुकाभर चर्चेत असलेले व्यक्तिमत्व बाळासाहेब नाहाटा हे मागील अनेक असंविधानिक घटनांबाबत तालुक्याला परिचित आहेत. १३८ चे प्रकरण, आदिवासी महिला अत्याचार प्रकरण, बनावट शिक्के प्रकरण, अजामीनपात्र प्रकरणात झालेली अटक या आणि अनेक प्रकरणातून बाळासाहेब नाहाटा श्रीगोंदा तालुक्यातील जनतेच्या समोर आले. गैरप्रकरणाबरोबरच श्रीगोंदा तालुक्यात झालेल्या पालकमंत्र्यांच्या covid-19 आढावा बैठकीमध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोर तालुक्यातील विविध अधिकाऱ्यांच्या कामकाजाबाबत प्रश्न उपस्थित करणारे बाळासाहेब नाहाटा यांचे झंजावाती भाषण संपूर्ण तालुका व प्रशासनाला हादरून टाकणारे होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

याच बाळासाहेब नाहाटावर श्रीगोंदा तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी काळे यांच्यावर १४व्या वित्त आयोगाच्या विकास कामांबाबत विचारपूस करत असतांना झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर धक्काबुक्कीत होत, बूट फेकून मारन्यापर्यंत झाले. या प्रकरणातून त्यांना सरकारी कामात अडथळा आणला म्हणून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी ते स्वतः पोलिस ठाण्यामध्ये हजर झाले. त्यांच्यासोबत त्यांचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्यावर ३५३, १८६, २९४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दुपारी २:०० वाजनेच्या सुमारास Bdo प्रशांत काळे हे संचालक राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण यांचे व्हिडीओ कॉन्फरन्ससाठी पंचायत समिती सभागृह येथे उपस्थित होते. या ठिकाणी सभागृहाकडे जात असतांना प्रविंकुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा हे त्यांना भेटले. मला अर्ज द्यायचा आहे. असे त्यांनी सांगितले. यानंतर काळे यांनी नाहाटा यांना सभागृहात भेटण्यासाठी सांगितले. तेथे बसल्यानंतर त्यांना खुर्ची देऊन अर्ज हातात घेत तो वाचून पाहून, संबंधित विभागाला पुढील कारवाई करणे संदर्भात Bdoनीं शेरा मारला. यानंतर नाहाटा यांनी तालुक्यात सरपंच अपात्रतेच्या किती कारवाया केल्या ? याबाबत विचारणा केली. यावर तालुक्यात माझ्या कार्यकाळात दोन कारवाई केल्याचे काळे यांनी सांगितले. मात्र, राग अनावर होऊन नाहाटा मोठमोठ्याने आरडाओरडा करून, हातवारे करत बोलू लागले. बिडीओ काळे व बाळासाहेब नाहाटा यांच्यामध्ये झालेल्या बाचाबाचीचे रूपांतर वादात होऊ लागले. Shrigonda .. BDO insults Prashant Kale, pulls him out of a government vehicle and tries to hit him with a shoe .. A case has been registered against Balasaheb Nahat ..

लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतीची तपासणी का केली? बाकीच्या नेत्यांचे ऐकून त्यांचे हातचे भावले होऊन काम करतोस काय? म्हणत बाळासाहेब नाहाटा यांनी प्रशांत काळे यांना अश्लील व घाण घाण शिव्या देऊन, नोकरी कशी करतोस ? असा सज्जड दम दिला. पायातील बूट काढून Bdo नां मारहाण करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर धावत गेले. यावेळी कर्मचारी नागेश लोखंडे यांनी दोघांनाही थांबवत आडवले. याठिकाणी पंचायत समितीचे कर्मचारी व कामानिमित्त आलेले तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. सार्वत्रिक बाळासाहेब नाहाटा यांनी बिडिओनां अर्वाच्य शिवीगाळ करत, शासकीय गाडीचा दरवाजा उघडून ओढून काळेनां बाहेर काढेल व शिवीगाळ करत शासकीय गाडीच्या काचेवर बूट मारला या फिर्यादीवरून बाळासाहेब नाहाटांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून, गुन्हा दाखल केला आहे.

Covid-19 आढावा बैठकीतील नाहाटांच्या भाषणाचे पडसाद:
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर दाखल गुन्ह्या संदर्भात नाहाटा समर्थकांशी चर्चा केली असता, त्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील स्थानिक प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना कोरोना संदर्भात धारेवर धरत, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या covid-19 च्या आढावा बैठकीमध्ये केलेल्या टीकेचे पडसाद असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

तालुक्यात लोक सहभागातून जर, कोविड केअर सेंटर्स उभे राहिले नसते. तर, स्थानिक प्रशासन मृत्युदर कमी करू शकले नसते. त्या आढावा बैठकीत हतबल झालेल्या यंत्रणेचे बाळासाहेब नाहाटानीं धिंडवडे काढले. त्याचा हा राग असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

स्रोत:(fir व कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading