दिनांक २१ जून, श्रीगोंदा:
शहरानजीकच्या आळेकर मळ्यातील बेगर्स होम परिसरातील वन क्षेत्रात एका अनोळखी ३० ते ३५ वयोगटातील महिला फिरत असल्याबाबत आसपास चाललेल्या चर्चेनुसार काल संध्याकाळी उशिरा येथील सामाजिक कार्यकर्ते नितीन रोही यांचे बंधू सचिन यांनी नमूद महिलेकडे जाऊन चौकशी केली. तर, ती थोडी मनोविकृती असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. मात्र, तिच्याकडे आणखी चौकशी केली असता, तिने तिच्या घरच्यांचा मोबाईल नंबर सांगितला. त्यावर संपर्क करत नमूद कार्यकर्त्यांनी या महिलेविषयी माहिती दिली. तर, ती महिला मागील दीड वर्षापासून घरातून बेपत्ता असल्याचे त्यांनी सांगितले.

ही महिला गोरठाणा पोलीस हद्दीतील लोहरा, उत्तर प्रदेश येथील रहिवासी असून, दीड वर्षापूर्वी एका ट्रकला हात करून, ही महिला घरातून बेपत्ता झाल्याचे तसेच, या महिलेला भुवळ (चक्कर) सदृश्य आजार असल्याचे तिच्या पतीने फोनद्वारे रोही यांना सांगितले. त्यांची कौटुंबिक परिस्थिती ही हालाखीची आहे. या महिलेला घेण्यासाठी तिचा घरच्यांना सचिन रोहि यांनी ‘फोन पे’ द्वारे दोन हजार रुपयांची मदत पाठवली असून, उद्या पर्यंत नातेवाईक व पती श्रीगोंद्यात पोहोचतील असा अंदाज आहे. श्रीगोंद्यातील ग्रामीण रुग्णालयात ही महिला भरती असून. तिची hiv सह शारीरिक अत्याचार संदर्भातील चाचण्या करण्यार येणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
बच्चुभाऊ कडू समर्थक व सामाजिक कार्यकर्ते नितीन रोहि यांच्या पुढाकाराने सदरील महिलेला उपचाराकरिता श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. नितीन रोही, हौसराव कोठारे, दत्ता जगताप, संपत कोठारे, अक्षय कोठारे, विजय नवले यांनी तिला दवाखान्यात भरती करीत स्थानिक प्रशासनास खबर देण्यासाठी मदत केली आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये वैद्यकीय कर्मचारी विकास तरटे, पूनम नेटके, प्रियांका लोखंडे, भारती काळे यांनी डॉ. नितीन खामकर व डॉ. संघर्ष राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली या महिलेवर तात्काळ उपचार सुरू केले आहेत. Shrigonda .. Success in contacting the family of a foreign woman who has been missing for a year and a half .. Admitted to hospital for treatment on the initiative of social workers ..
या प्रकरणी पोलीस निरीक्षक ढिकले यांना रोहींनी संपर्क करून सदर घटनेची माहिती दिली असता, त्यांनी आमच्या अखत्यारीतला विषय नसल्याचे सांगितले असून, तहसीलदार प्रदीप पवार यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याचे नितीन रोही यांनी माध्यमांना सांगितले आहे.
स्रोत:(ग्रामीण रुग्णालय)
