#श्रीगोंदा..१४व्या’ वित्त आयोगातील विकास कामांअंतर्गत भूमिगत गटार योजना शुभारंभ..

दिनांक २१ जून,श्रीगोंदा:

कोरोना संक्रमण काळात वैद्यकीय क्षेत्रा व्यतिरिक्त विकास कामांना कात्री लागत असतानाही श्रीगोंदा नगरपालिका (नगराध्यक्षा) सौ.शुभांगी पोटे, (गटनेते) मनोहरदादा पोटे यांनी (महसूलमंत्री) ना.बाळासाहेब थोरात, (नगरविकास राज्यमंत्री) ना.प्राजक्तदादा तनपुरे, जिह्यातील मंत्री, तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते यांच्या मदतीने (नगरविकास मंत्री) ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून, विकास कामांसाठी कोट्यावधी रुपये निधी मिळविला.

भविष्यात देखील निधी मिळवू आणि शहर विकसित करू, असे माजी आमदार तथा जिल्हा बँक संचालक राहुल दादा जगताप यांनी शहराजवळील शिक्षक कॉलनी येथील भूमिगत गटार योजना शुभारंभ प्रसंगी बोलताना केले.

https://bit.ly/bspmycityshrigonda

‘१४व्या’ वित्त आयोगातील विकास कामां अंतर्गत भूमिगत गटार योजना शुभारंभ राहुल जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी स.म.शिवाजीराव नागवडे सह.साखर कारखाना (चेअरमन) राजेंद्र दादा नागवडे होते. तर, आ.बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, दीपक भोसले, हरिदास शिर्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

जगताप म्हणाले कोरोना काळात ग्राम पंचायतीला निधी आलेला परत जाण्याची वेळ आली. विकास कामांना कात्री लावण्यात आली. पण पोटे दाम्पत्याने शहर विकासासाठी पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावले. या भागात रस्ते साठी निधी मिळविला, गटारीचा प्रश्न मार्गी लागला.

राजेंद्र दादा नागवडे म्हणाले, पोटे दाम्पत्य सर्व नेते, सर्व नगरसेवक यांना विकास कामात बरोबर घेऊन, काम करत आहेत. कोरोना काळात देखील शहर विकास कामे सुरू आहेत.

आ.बबनराव पाचपुते यांनी निधी मिळत आहे. कामे करा सर्वांना बरोबर घ्या, असे सांगितले. Shrigonda .. 14th Finance Commission launches underground sewerage scheme under development works ..


चौकट-आ.बबनराव पाचपुते यांनी बोलताना बहुमत असताना काही नगरसेवक गैरहजर राहिले. याकडे लक्ष वेधले असता, मनोहर पोटे यांनी लागलीच निरोप सर्वांना दिल्याचे सांगितले. तसेच, आ.पाचपुते यांनी सदर काम ‘१४व्या’ वित्त आयोगातील आहे. पालिका नगराध्यक्ष व समर्थकांनी अधिक निधी मिळविला का? असा प्रश्न करता पोटे यांनी आम्ही महाविकास आघाडी सरकार कडे पाठपुरावा करून ५ कोटी व एकूण १४ ते १५ कोटी रुपये निधी विविध विकास कामांसाठी मिळविला, असे स्पष्ट केले.

यावेळी शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे, संतोष खेतमाळीस, नगराध्यक्षा सौ.शुभांगी पोटे, नगरसेवक गणेश भोस, राजू लोखंडे, सतीश मखरे, निसार बेपारी, स्थानिक नागरिक आदी उपस्थित होते.

स्रोत:(प्रसिध्दीपत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading