#श्रीगोंदा.. मांडवगण शिवारात गांजाची शेती करणारा अटकेत..५ लाख ४० हजार रु. किंमतीच्या ५४ किलो गांजाची ११० झाडे जप्त.. श्रीगोंदा पोलिसांची कारवाई..

दिनांक १६ मे(मांडवगण,श्रीगोंदा):

दिनांक १५ मे रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, मांडवगण शिवारात इसम नामे रामदास गेणु रायकर रा.मांडवगण, ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर हा त्याचे शेतामध्ये नशाकारक गांजाचे झाडांची लागवड करुन, शेती करत आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

त्याबाबत पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांना सदरची माहीती देवुन, छाप्याविषयी नियोजन केले. मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी मांडवगण शिवारात छापा मारला असता, आरोपी रामदास गेणु रायकर याने त्याचे शेतात गांजाचे झाडांची लागवड केली असल्याचे पोलिसांना दिसले. शेताची झडती घेतली असता, शेतात लहान मोठी एकुण ११० गांज्याची झाडे मिळुन आली.त्यांची मोजणी केली असता वजन ५४ किलो.भरले असून त्याची किंमत प्रत्येकी १० हजार रु. प्रतिकिलो प्रमाणे एकुण पाच लाख चाळीस हजार रु. किंमतीचा ओला पाला असलेला मिळुन आल्याने पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करुन ते जप्त करण्यात केलीले आहे.

आरोपीने गावापासुन दुर अंतरावर माळरान शेतावर कोणाच्या नजरेस पडणार नाही. अश्या ठिकाणी गांजाचे झाडांची चोरटी विक्री करण्याचे उददेशाने लागवड केली असल्याचे दिसुन आले. सदरचे नशाकारक पदार्थ गांजा हे केंद्रशासनाने प्रतिबंधित केले असल्याने, पोकॉ किरण बोराडे यांचे फिर्यादी वरुन, पोलीस स्टेशनला एन.डी.पी.एस.अँक्ट १८८५ कलम २० (क) (ख) (1) प्रमाणे दाखल करण्यात आला असुन आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे. Shrigonda.. Cannabis cultivator arrested in Mandvagan Shivara.. 5 lakh 40 thousand rupees. 110 saplings of 54 kg cannabis seized by Shrigonda police

पुढील तपास सपोनि दिलीप तेजनकर हे करीत आहे. सदरची कामगिरी मनोज पाटील सो, पोलीस अधिक्षक अहमदनगर, सौरभकुमार अग्रवाल सो, अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर, अण्णासाहेब जाधव सो, (उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत) यांचे मार्गदर्शनाखाली (श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे) रामराव ढिकले पोलीस निरीक्षक श्रीगोंदा, (तालुका कृषी अधिकारी) पद्मनाभ म्हस्के तसेच श्रीगोंदा पोस्टेचे (सपोनि) दिलीप तेजनकर, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ दादा टाके, पोकॉ गोकुळ इंगवले, किरण बोराडे, पोकॉ प्रकाश दंदाडे यांनी केली आहे.

स्रोत:(प्रेसनोट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading