“शेख महंमद बाबा देवस्थान विकासकामासाठी डॉ.संतोष हिरडे यांच्या कडून २५ ह.रु.मदत, आमीन शेख यांच्या कडे २५ ह.रु.धनादेश सुपूर्त”

दिनांक १७ मे,श्रीगोंदा:

रमजान ईद व अक्षय तृत्तीया याचे औचित्य साधून श्रीगोंदा येथील सुफी संत शेख महंमद बाबा यांच्या देवस्थान विकासकाम, सुशोभिकरणासाठी “पुरमपुज्य मोरे दादा हॉस्पीटलचे” डॉ.संतोष हिरडे यांच्या वतीने शेख महंमद बाबा यांचे वंशज, ट्रस्टचे अध्यक्ष अमीनभाई शेख यांच्याकडे २५ हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला आहे.

यावेळी माजी उपनगराध्यक्ष फक्कडराव मोटे, (मा.उपनगराध्यक्ष) अख्तरभाई शेख, दत्ता जगताप, बंडूभाई शेख, अजिज शेख, गोरख कविटकर, महशे हिरडे, निखील भागवत, नितीन शिंदे, अल्ली शेख, विकास बोरूडे, राजु शेख, नितीन ननवरे, नंदकुमार चव्हाण, चाँद शेख, रियाज शेख, सचिन शिंदे आदि उपस्थित होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी बोलताना दत्ता जगताप म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळामध्ये आज खरतर संपुर्ण समाज संकटात सापडलेला आहे. प्रत्येक जन जिवन जगण्यासाठी धडपडत आहे आणि हे जिवन जगत असताना, डॉक्टर सर्व समाजाला जिवन जगण्यासाठी जो आधार देत आहेत, त्यातील उल्लेखणीय नाव म्हणजे डॉ. संतोष हिरडे, आपल्या मोरे दादा हॉस्पीटलच्या माध्यमातून लोकांना सेवा देत आहेत. सेवा देत असताना सुद्धा कमीत कमी बिल आकारुण त्यांना उत्तम सेवा देण्याचा त्याचा जो सेवाभाव आहे. तो श्रीगोंदेकरांना गेल्या एक वर्षापासून दिसून आलेला आहे. रुग्णांकडून कमीत कमी बिल आकारुन सेवा देणारे डॉक्टर हिरडे यांनी एक सामाजिक भान लक्षात घेवून, श्रीगोंद्यातील सुफी संत शेख महंमद बाबा देवस्थान विकास कामासह सुशोभिकरणासाठी दिनांक १६ मे रोजी २५ हजार रुपयांचा धनादेश शेख महंमद बाबा यांचे वंशज,ट्रस्टचे अध्यक्ष अमीनभाई शेख यांच्या कडे सपुर्त केला. श्रीगोंदेकरांच्या वतीने डॉ.सतोष हिरडे यांचे मी आभार मानतो. त्यांनी एक चांगला संदेश डॉक्टरांच्या माध्यमांतून सर्व समाजाला दिला आहे. त्याची इतरानींही दखल घेवून अशाच पद्धतीने समाज हिताचे आपण काही तरी देणे लागतो, स्वःताचा प्रपंच सर्वजन नक्कीच करत असतात हे करत असतांना समाजासाठी किंवा धार्मीक स्थळांसाठी आपण फुल ना फुलाची पाकळी दिली पाहिजे, असा चांगला संदेश डॉ.हिरडे यांनी दिला असल्याचे जगताप म्हणाले.”25% assistance from Dr. Santosh Hirde for Sheikh Mohammad Baba Devasthan development work, 25 HR checks handed over to Amin Sheikh”

शेख महंमद बाबा यांच्या देवस्थानच्या विकासकामासाठी डॉ.संतोष हिरडे यांनी जी मदत दिली. त्याबद्दल शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्टच्या वतीने अमीन शेख यांनी त्यांचे आभार व्यक्त करत म्हणाले की, कोरोना महामारी गेल्यानंतर सर्वांना बरोबर घेवून, या देवस्थानचा विकास करणार असल्याचे सांगितले.

स्रोत:(शेख महंमद बाबा ट्रस्ट)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading