दिनांक १७ मे(आढळगांव,श्रीगोंदा):
वाढत्या कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर आढळगांव येथे नीलेश लंके प्रतिष्ठान (महाराष्ट्र राज्य), कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटिल, बहुउद्देश्यीय संस्था, स्व. बन्शीलाल जवानमल नाहाटा चरिटेबल ट्रस्ट, स्व. दिलीप गांधी प्रतिष्ठान संचलित तसेच युवा नेते शरद जमदाडे यांच्या नेकृत्वाखाली ५० बेडचे श्री. सिद्धेश्वर कोविड सेंटर आढळगांव या नवाने हे २६ एप्रिल रोजी पंडित जवाहरलाल नेहरू विदयालयात चालू करण्यात आले आहे.
या सेंटर मधून आतापर्यंत १४२ पैकी १०६ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात यश आले आहे. सध्या ३६ रुग्ण सक्रिय आहेत. सेंटर मधील प्रत्येक स्वयंसेवकाला दिलेल्या जबाबदारी प्रमाणे जो तो आपले कार्य पूर्ण करण्याचा पर्यंत करत आहे. त्या मध्ये दिनकर पंडित हे सेंटरचे सचिव असून, त्यांच्याकडे वर्गनी व किरकोळ हिशोबची जबाबदारी आहे. मनोज ठवाळ हे सेंटर मधील पेशेंटचे व स्वयसेकांचे जेवनाचे नियोजन पाहतात. तसेच, या काळामध्ये लोक घराच्या बाहरपडण्यासाठी घबरतात अश्या मध्ये गवातील अर्चना ताई जाधव, रेखा ताई ठवाळ, सुनीता ताई गव्हाने ह्या महिला सेंटर मध्ये जाऊंन मदत करत सगळ्यात महत्वाची भूमिका बजावत आहेत. सेंटर मधील रूग्णांना सकाळी चहा, नास्ता, दोन वेळचे जेवन बनून देण्याचे काम याच्याकड़े आहे. सकाळी चहा, बिस्किट, २ अंडे, काजू, बदाम, उपिट, गावरण तुपातील शिरा दुपरच्या जेवनामध्ये चपाती, सुकि भाजी, पातळ भाजी, वरण, भात हे देण्यात येते. तसेच, माउली उबाळे याच्याकड़े सेंटरसाठी लागणारे मेडिसिन डॉक्टरांच्या सल्ल्याने आण्याची जबाबदारी माऊली उबाळे व यशवंत झगडे यांच्याकडे आहे.


किरण बंड हा पेशंटला शारीरिक व मानसिक दृष्टिने मजबूत ठेवन्याचे काम करतो. सकाळी योगा घेणे, संध्याकाळी रूग्णांकडून व्यायाम करुण घेण्याचे काम त्याच्याकड़े आहे. तसेच, पेशंटला जेवन देण्याचे काम करतो. त्यासाठी त्याला अकबर तांबोळी, पंडित दिनकर तसेच शरद जमदाडे हे सहकार्य करतात.
सुभान तांबोळी हे निलेश लंके प्रतिष्ठान श्रीगोंदा तालुका अध्यक्ष असून, ते त्यांच्या गुरुंचा आदर्श घेऊन काम करत आहेत. त्यांच्याकड़े पेशंटची जबाबदारी आहे. ते पेशंटला सेंटरमध्ये एडमिट करुण घेण्यापासून तर, पेशंटला डिस्चार्ज होईपर्यंत त्यांच्यावर लक्ष देने तसेच, पेशंटला बेडची व्यवस्था करणे, रुग्ण वार्डची साफ सफाई करणे, सेंटर परिसर सॅनिटाइज करणे, पेशंटला काही कमी जास्त त्याची काळजी घेणे, ज्या पेशंटला ऑक्सीजन बेडची गरज आहे. त्याला बेड उपलब्ध करुण देने, सेंटरमधून जाण्यासाठी पेशंटला अम्बुलसची सोय करुन देने. यासाठी त्यांना माउली उबाळे सहकार्य करतात.
या सगळ्या यंत्रनेवर लक्ष ठेवण्याचे काम हे शरद जामदाडे व अमोल गव्हाने करत आहेत. त्याच बरोबर मा. सरपंच देवराव वाकड़े व मा. उप सरपंच जिजाराम डोके, सुभाष डोके, तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आढळगांव व पंचक्रोशितील नागरिकांनी सेंटर साठी भरभरून वर्गनी दिली आहे. त्यामध्ये कोकणगांव, भावडी, वडगांव, तांदळी, या गावांमधून मोठ्या प्रमानात वर्गनी देण्यात आली आहे. आढळगांवचे संदीप शेठ गुगळे व सुरेंद्र शेठ गांधी यांनी कोविड केअर सेंटर मधील पेशंटच्या जेवनाची सर्व सोय त्यांच्या मार्फत केली आहे. सेंटरसाठी परदेशातुनही मदत आली आहे. adhalgaon-kovid-center-which-emerged-from-the-concept-of-subhan-tamboli
नमूद सेंटरसाठी सर्वात महत्वाची भूमिका डॉ. नेमीचंद निकम, डॉ. प्रमोद गायकवाड, डॉ. कुमुदिनी शिंदे मॅडम, डॉ. शिंदे हे सगळे पूर्ण वेळ देऊन, मोफत सेवा देण्याचे काम करत आहेत. त्यांच्या अनुभवाप्रमाणे १०६ कोरोना बाधित रुग्णांना कोरोनावर विजय संपादन करण्यात यश आले आहे. या केअर सेंटरकडे तालुका आरोग्य विभागाचे व प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे जाणवत आहे.
स्रोत:(सुभान तांबोळी, आढळगाव)
