दिनांक १७ मे,श्रीगोंदा:
देशातील पेट्रोल, डिझेल, गॅस, खाद्यतेल यांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून, सोबतच खतांच्या किमती मध्ये मोठी वाढ करून केंद्र सरकारने सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. या भाववाढीच्या निषेधार्थ श्रीगोंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गाडी ढकल आंदोलन हे पेट्रोल पंपासमोर जाऊन फुले देऊन केले गेले.

केंद्र सरकारची ही मनानामनी रोखण्यासाठी, केलेली दरवाढ हाणून पाडण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. हे आंदोलन कोरोना या साथ प्रतिबंधक कायदयाचे सर्व नियम काटेकोरपणे पालन करून करण्यात आले आहे. काही दिवसांपासून सातत्याने होत असलेल्या पेट्रोल, डीझेल, खाद्यतेल, खते यांच्या दरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणात दरवाढ वाढली आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. कोरोना संकटातून कसाबसा आपला जीव वाचवण्यासाठी मागील काही महिन्यांपासून नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देवून, लोक घराबाहेर पडले नाही. गेली कित्तेक महिने झाले अनलॉक सुरु झाल्यापासून हळूहळू सर्व छोटे-मोठे व्यवसाय सुरु होत असतांना वाढलेल्या पेट्रोल-डीझेल खाद्यतेल खते दरवाढीमुळे विपरीत परिणाम होवून या व्यावसायिकांचे, सर्वसामान्यांचे तसेच शेतकऱ्यांचे अर्थचक्र बिघडले आहे.Petrol, diesel, gas, edible oil, fertilizer price hike on behalf of the common people in Shrigonda NCP pushing agitation.
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा विचार करून, वाढलेल्या पेट्रोल डिझेलच्या किमती व रासायनिक खताच्या किमती कमी कमी करत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या आंदोलनासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (तालुकाध्यक्ष) ऋषिकेश गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागचे (तालुकाध्यक्ष) संदिप उमाप, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे (तालुकाध्यक्ष) विजय खेतमाळीस, (उपाध्यक्ष) आकाश भोसले, सामाजिक न्याय विभागचे (शहराध्यक्ष) राहुल बागे, मंगेश मोटे, सुनील सिदणकर, आण्णा हिरडे आदी कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत:(राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा)
