शैलाताई मुकुंद सोनटक्के यांचे अल्पशा आजराने निधन..

दिनांक १८ मे,श्रीगोंदा:

तालुक्‍यात फुले-शाहू-आंबेडकर चळवळीत कार्यरत असणारे सामाजिक कार्यकर्ते मुकूंद सोनटक्के यांच्या पत्नी स्वर्गीय शैलाताई सोनटक्के यांचे जहांगीर हॉस्पिटल पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले आहे. त्या पन्नास वर्षांच्या होत्या. त्यांना मागील काही दिवसांपासून हृदय विकाराचा त्रास जाणवत होता. या उपचारासाठी त्यांना जहांगीर हॉस्पिटल पुणे येथे भरती करण्यात आले होते.

https://bit.ly/bspmycityshrigonda

तालुक्यातील फुले आंबेडकर विचार मंचचे सक्रिय पदाधिकारी व आंबेडकरी चळवळीचा बुलंद आवाज असणाऱ्या मुकुंद सोनटक्के यांच्या पत्नी तसेच युवा उद्योजक आणि पोल्ट्री व्यवसायातील नामांकित व अभ्यासू असलेले वैभव सोनटक्के तर खत व्यवसायामध्ये सक्रिय सागर सोनटक्के यांच्या आई स्वर्गीय शैलाताई मुकुंद सोनटक्के यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. shailatai-mukund-sontakke-passed-away-due-to-alpsha-disease…

स्रोत:(संतोष इथापे,श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading