कोरोणावर मात केलेल्या कुटुंबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार घालून, गृहप्रवेश केला…

दिनांक १८ मे,श्रीगोंदा:

श्रीगोंदा साळवन देवी रोड येथील गट क्रमांक १७९३ संभाजीनगर परिसर या नागरी वस्तीमध्ये कोरोणाने थैमान घातले होते. नमूद परिसरातील नागरिकांनी कोठेही दवाखान्यात ऍडमिट न होता, घरीच होम क्वारंटाइन राहून डॉक्टरांच्या सल्ल्याने गोळ्या, औषधे वेळेला व उत्तम आहार घेऊन, कोरोणावर मात करीत वस्तीतील नागरिकांनी कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला हार घालून जल्लोष केला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळेस रुग्णांच्या अंगावर पुष्पांचा वर्षाव करून त्यांचे घरामध्ये स्वागत केले. कोरोणा हा आजार तसा पाहिला तर खूप सोपा आहे. परंतु, घाबरून, टीव्ही पाहून लोकांच्या मनामध्ये भीती तयार होते. यामुळे ३० ते ४०% लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. The families who conquered Korona entered the house wearing garlands on the image of Chhatrapati Shivaji Maharaj …

मित्राहो घाबरण्याचे काहीच कारण नाही आपण ठणठणीत बरे होऊ शकतो हा आत्मविश्वास मनामध्ये ठेवून पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीने घाबरून न जाता गोळ्या, औषधे व चांगला आहार घेणे यावरती भर द्यावा प्रत्येक व्यक्तीने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या मास्क लावा ठराविक अंतर ठेवा गर्दी टाळा घरीच थांबा नक्कीच कोरोणावरती मात करू, असे मत कोरोनातुन नुकतेच मुक्त झालेले नाना शिंदे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रसिद्धी पत्रात केला आहे.

स्रोत:(नानासाहेब शिंदे,संभाजी ब्रिगेड, श्रीगोंदा)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading