दिनांक १८ मे, श्रीगोंदा:
तालुका शिवसेना, युवासेना यांच्यावतीने शहर व तालुक्यातील कोविड सेंटरला फळं व १०० गरजू कुटुंबांना प्रत्येकी ७ किलो प्रमाणे अन्नधान्य वाटप करण्यात आले.

श्रीगोंदा शहरातील संत शेख महंमद महाराज कोविड सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय कोविड सेंटर, चांडगाव येथील चांडेश्वर कोविड सेंटर, आढळगाव येथील सिद्धेश्वर कोविड सेंटर, पारगाव येथील सुद्रिकेश्वर कोंविड सेंटर, तसेच, लोणी व्यंकनाथ, बेलवंडी, पिंपळगाव पिसा येथील अजित दादा पवार कोविड सेंटर, कोळगाव कोविड सेंटर, घारगाव कोविड सेंटर येथे फळवाटप करण्यात आले. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार ८० टक्के समाजकारण, वीस टक्के राजकारण या माध्यमातून आपण समाजाचा काहीतरी देणे लागतो. या उद्देशाने हा उपक्रम श्रीगोंदा तालुका शिवसेना व युवा सेना यांच्या वतीने राबविण्यात आला. Distribution of fruits and food grains to 100 needy families at Kovid Center in the city and taluka on behalf of Taluka Shiv Sena, Yuvasena.
या उपक्रमांमध्ये शिवसेना (तालुकाप्रमुख) बाळासाहेब दुतारे, शिवसैनिक अक्षय खेतमाळीस, शिवसैनिक निलेश गोरे, शिवसैनिक श्रीराम मस्के, (युवा सेना उपतालुका प्रमुख) शिवाजी दांगडे, शिवसैनिक ऋषिकेश खरात, संभाजी घोडके, दादासाहेब चाकणे या सर्वांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविण्यात आला.
स्रोत:(बाळासाहेब दूतारे,शिवसेना)
