कोरोना आजाराला निगेटिव्ह करण्यासाठी,श्रीगोंदा शहरवासीयांचा ‘जनता कर्फ्यूला’ पॉजीटिव्ह प्रतिसाद..
शंभर टक्के शहर बंद..
दिनांक २२ मार्च श्रीगोंदा:
देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाला कोरोनाच्या प्रादुर्भावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून,एक दिवस घरात बसण्याचे आवाहन केले होते.त्या आव्हानाला श्रीगोंदा शहर वासियांनी उस्फुर्त प्रतिसाद देत,आजचा दिवस घरात राहण्याचे ठरवले.त्यानुसार श्रीगोंदा शहरामध्ये सर्व चौक,आसपास परिसर व इतर सर्व ठिकाण आज शंभर टक्के बंद राहिली आहेत.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही कोरोना साथीच्या प्रादुर्भावा संदर्भात जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज केली असून,गर्दी टाळण्यासाठी स्वतः कलेक्टर रस्त्यावर उतरले आहेत.
त्याचप्रमाणे श्रीगोंदा शहरासह तालुक्यातही (तहसिलदार)महेंद्र माळी,(पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव,(आरोग्य अधिकारी)नितीन खामकर,(नगरपालिकेचे मुख्याधिकारी)जगताप हे स्वतः शहरातील विविध भागात तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन स्पीकरद्वारे गर्दी टाळण्या संदर्भात सुचना करत आहेत.
काही दिवसांपासून उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये स्थानिक प्रशासन म्हणून कार्यरत असलेले,नमूद अधिकारी,स्वतःच्या कुटुंबासह संबंधितांपासून दूर असतांनाही,जनहितार्थ आपले कर्तव्य आत्मीयतेने पार पाडत असल्याने,त्यांचे सर्वस्तरांतून मनोमन कौतुक केले जात आहे.
आज दिनांक २२ मार्च रविवार रोजी श्रीगोंदा शहरातील बंदचे काही छायाचित्रे..







