#श्रीगोंदा…आंबेडकरी कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करून, त्यास गावातून बहिष्कृत करू पाहणाऱ्या जातीवाद्यासह पोलीस निरीक्षकावर कारवाईची मागणी…पुरोगामी संघटना आक्रमक..

दिनांक ४ जून (राजापूर,श्रीगोंदा):

तालुक्यातील राजापूर येथील पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते तसेच, मागासवर्गीयांच्या अत्याचारीत घटनांमध्ये पीडितांना वारंवार मदत करणारे संतोष शिंदे यांच्यावर येथील वाळू व माती माफियाने प्रशासनाच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करीत, गावातुन बहिष्कृत करण्याचा कट रचला आहे.

या घटनेचा निषेध करण्यासाठी आज तालुक्यातील आंबेडकरवादी संघटनांचे पदाधिकारी (पोलीस उप विभागीय अधिकारी, कर्जत) आण्णासाहेब जाधव यांना भेटले. समाजात सक्रिय असणाऱ्या सामाजिक घटकांवर होणाऱ्या अन्यायकारक वागणुकीमुळे प्रशासकिय अधिकार्‍यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे बसपा जिल्हा प्रभारी सुनील ओहोळ यांनी यावेळी नमूद केले आहे. पुरोगामी चळवळीतील ज्येष्ठ पदाधिकारी जीवाजी घोडके यांनी या घटनेचा निषेध करीत, तालुक्यातील आंबेडकरी कार्यकर्त्यांवर जर, गावांतुन बहिष्कृत होण्याची वेळ येत असेल. तर, स्थानिक प्रशासनामधील अधिकारी व राजकीय वरदहस्त आणि जातीय द्वेष करणाऱ्या शक्तीं विरोधात सामाजिक घटक संघटित होऊन जन आंदोलन उभे केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. अशी आव्हानात्मक भूमिका आज उप विभागीय कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी मांडली.

https://bit.ly/bsphttps://bit.lyhhttps://bit.ly/bspmycityshrigondattps://bit.ly/bspmycityshrigonda/bspmycityshrigondamycityshrigonda

https://bit.ly/bspmycityshrigonda

या प्रकरणी सविस्तर वृत्त असे की, दिनांक २९ मे २०२१ रोजी सामाजिक कार्यकर्ते संतोष शिंदे यांच्यावर बेलवंडी पोलीस स्टेशन (तालुका श्रीगोंदा) येथे दरोडा व भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेत घटनास्थळी संतोष शिंदे उपस्थित नसतांना केवळ जातीवादी भावनेतून गुन्हे दाखल केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शिवाय फिर्याद दाखल करणारा राजाराम ढवळे हा स्वतः वाळू व माती माफी असून, यापूर्वी त्याच्यावर स्थानिक प्रशासनाने अनधिकृत वाळू उत्खनन केल्याने पर्यावरण संरक्षण कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मोठ्या राजकीय लोकांशी ढवळे याचे संबंध असून, त्याची नमूद परिसरात मोठी दहशत आहे. केवळ जातीय द्वेषातून व राजकीय पाठबळाने त्यांने ही फिर्याद दाखल केली असून, ज्या गट क्रमांक १४० मध्ये माती तस्करी होत असल्याचे ढवळेचे म्हणणे आहे. तो गट घोड धरणासाठी महाराष्ट्र शासनाने अधिग्रहीत क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.

याचबरोबर हे क्षेत्र घोड धरणामध्ये (चिंचणी धरण) असतांना वाळू माफिया राजाराम ढवळे व आरोपींना पाठीशी घालणारे पोलीस निरीक्षक, बेलवंडी संपतराव शिंदे यांनी संगनमताने संतोष शिंदे व इतर दहा लोकांवरती अनधिकृत रित्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत. पोलीस प्रशासनाने स्थानिक महसूल प्रशासनाशी चौकशी न करता, असंविधानिक पद्धतीने राजाराम ढवळे यांना साथ देणाऱ्या बेलवंडी पोलीस स्टेशनचे (पोलीस निरीक्षक) संपतराव शिंदे यांनी संतोष शिंदे या प्रामाणिक, आंबेडकरवादी कार्यकर्त्यावर भांदवि कलम ३९५ तसेच शस्त्र कायदा अधिनियम १९५९ चे ३, ४, २५ प्रमाणे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत.

सदर प्रकरणाची चौकशी करून, राजाराम ढवळे व त्यास मदत करणारे लोकसेवक (पीआय,बेलवंडी) संपतराव शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी (बहुजन समाज पक्षाचे जिल्हा प्रभारी) सुनील ओहोळ, (बहुजन समाज पार्टीचे श्रीगोंदा विधानसभा प्रभारी) जिवाजीराव भानूदास घोडके, (वंचित बहुजन आघाडी युवक तालुकाध्यक्ष) महेंद्र थोरात, (बहुजन समाज पार्टी श्रीगोंदा विधानसभा सचिव) राहुल छत्तीसे, (जिल्हा प्रभारी बसपा) सचिन घोडके, (माजी जिल्हाध्यक्ष, बसपा) शंकर भैलुमे, सह बाळू राघू शिंदे यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांची भेट घेऊन, नमूद प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. shrigonda-demand-for-action-against-casteist-rajaram-dhawale-and-belwandi-police-inspector-sampatrao-shinde-who-are-trying-to-expel-ambedkar-activists-by-filing-false-cases-against-santosh-shinde

तालुक्यात वाढत चाललेले अराजक तत्व, अवैद्य धंदे व वाळू माफियांचा कहर पाहता, श्रीगोंदा तालुक्यामध्ये कायद्याचे राज्य राहिले नसल्याचे चित्र स्पष्ट होत असतांना, प्रशासकीय यंत्रणेतील प्रमुख पोलिस निरीक्षक शिंदे हे अवैद्य वाळू उत्खनन करणाऱ्या व्यक्तीला मदत करतात. तसेच, राजकीय दबाव व जातीयवादी भूमिकेत आंबेडकरवादी कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करतात. ही निंदणीय व निषेधार्य बाब असून, या प्रकरणी लवकरच जनआंदोलन करण्यात येणार असल्याचे पुरोगामी चळवळीतील या कार्यकर्त्यांनी (DYSP) जाधव यांना भेट घेऊन सादर केलेल्या निवेदनातून स्पष्ट केले आहे.

स्रोत:(निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading