श्रीगोंदा ग्रामपंचायत निवडणूक.. दिग्गजांच्या पदरी पराभव..

दिनांक १८ जानेवारी, श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, माजी अध्यक्ष व जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिकांच्या पत्नी सुनीता महाडिक तसेच जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व कुकडी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन अनिल विर यांचा दारुण पराभव झाला आहे.

https://bit.ly/bspmycityshrigonda

चांडगाव येथील भाजपचे पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांच्या पॅनलला अवधी १ जागा मिळाली आहे. राजापूर ग्रामपंचायतमध्ये विद्यमान सभापती गीतांजली पाडळे यांचे पती शंकर पाडळे यांनी बाजी मारली असून, नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष केशव भाऊ मगर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने येथे घवघवीत यश मिळविले आहे.

तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतीची निवडणूक दि. १५ रोजी पार पडली होती. यामध्ये ढवळगाव ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, उरलेल्या ५८ ग्रामपंचायतींची आज मतमोजणीत झाली. यात वांगदरी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपचे तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र, आदेश नागवडे यांनी १०० मतांनी त्यांचा पराभव केला. वडघुल ग्रामपंचायती मध्ये भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक यांच्या पत्नी सुनीता महाडिक यांचा चांगुणा अजिनाथ कळमकर यांनी १२२ मतांनी पराभव केला.

येळपनेत जिल्हा परिषदेचे माजी सदस्य व कुकडी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन अनिल वीर यांचा मानसिंग ठानगे यांनी पराभव केला. चंडगाव येथे भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र म्हस्के यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलला अवघ्या १ जागेवर समाधान मानावे लागले आहे.

टाकळी कडेवळीत नागवडे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब इथापे व सुदाम नवले यांनी सत्ता परिवर्तन केले. आढळगाव येथे आमदार बबनराव पाचपुते यांच्या कट्टर समर्थक पत्रकार उत्तम राऊत यांनी पॅनलला ६ जागा मिळवत यश संपादन करत सत्तेच्या जवळ गेले आहेत.

जि.प.सदस्य अनिल ठवाळ यांच्या पत्नी व मुलगा निवडणूक रिंगणात उभे होते. मात्र, अनिल ठवाळ यांचा मुलगा श्रीकांत ठवाळ यांना पराभव पत्करावा लागला आहे. अनुराधा ठवाळ या विजयी झाल्या आहेत.

बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांचे समर्थक असलेले शेडगाव ग्रामपंचायतीचे सरपंच विजय शेंडे यांनी पुन्हा विरोधकांवर मात करत, ११ पैकी ८ जागेवर यश संपादन केले आहे.

निवडणुक प्रक्रियेत सुरवातीपासून चर्चेत असलेल्या कौठा ग्रामपंचायत निवडणुकीत गणपत परकाळे यांच्या पॅनलचा शाहूराजे शिपलकर यांच्या पॅनलने ११ – ० असा परभव केला आहे.

स्रोत:(पत्रकार दादासाहेब सोनवणे)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading