श्रीगोंदा: ‘नक्षत्र हॉटेल’ अल्पवयीन मुलीमुळे वादाच्या भोवऱ्यात; आता संपूर्ण अवैध धंद्यांवर कारवाईसाठी १३ ऑक्टोबरला धरणे आंदोलन.!

दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ श्रीगोंदा:

(#श्रीगोंदा: ‘अवैध धंद्यांचा अड्डा’ ठरलेल्या पेडगाव रोडवरील हॉटेलवर कारवाई कधी? जेवणातून नशा .. अनं अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य.. शोषण..? पोलिसांची ‘संशयास्पद’ भूमिका.!
https://wp.me/pghQ6Y-2Uu)

श्रीगोंदा येथील नक्षत्र हॉटेलवर मुलासोबत चार तास एक अल्पवयीन मुलगी आढळून आल्याने मोठ्या वादाच्या भोवऱ्यात हे हॉटेल सापडले आहे. हॉटेलवर चालू असलेल्या अवैध आणि अश्लील उद्योगावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

या घटनेमुळे श्रीगोंदा शहर आणि तालुक्यामधील अल्पवयीन मुलींच्या आणि महिलांच्या शारीरिक व लैंगिक शोषणाचे गंभीर प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. नक्षत्र हॉटेलवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

(#अहिल्यानगर पोलीस.. वाढत्या गुन्हेगारीवर ‘टू प्लस’ची करडी नजर.. https://wp.me/pghQ6Y-2UI)

नक्षत्र हॉटेलवरील घटनेच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा शहरात चालू असलेले वेश्याव्यवसाय, जुगार, गांजा, मटका, दारू (देशी, हातभट्टी, नकली), कॉलेज परिसरात विक्री होणारे उच्च दर्जाचे कॉफीयुक्त पेय आणि कॉलेज परिसरातील गस्त यासह शहरातील व तालुक्यातील सर्व अनधिकृत उद्योगांवर ठोस कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

(अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील आरोपींना सत्र न्यायालयाकडून दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला . . https://wp.me/pghQ6Y-2UB)

या घटनांच्या अनुषंगाने, वसंतराव सकट यांनी माध्यमांना माहिती दिली आहे की, नक्षत्र हॉटेलवर कारवाई आणि इतर अवैध धंद्यांवर श्रीगोंदा पोलिसांनी ठोस कारवाई करावी, तसेच पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या कारभाराची चौकशी व्हावी, या मागण्यांसाठी दिनांक १३ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसील कार्यालय, श्रीगोंदा येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्यावर सर्वसामान्य आणि मागासवर्गीय प्रती रोष व राग व्यक्त केल्याचा आरोप करत त्यांच्यावरही कारवाई करण्यासाठी हे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

स्रोत:(मुलाखत)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading