#श्रीगोंदा.. मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना, युवासेनेच्या वतीने ५० गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप..

दिनांक १३ जून, श्रीगोंदा:

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख पर्यावरण मंत्री, पर्यटनमंत्री तथा राजशिष्टाचार मंत्री श्रीमान आदित्यजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीगोंदा तालुका शिवसेना व युवासेना यांच्या वतीने ५० गरजू कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले.

यानिमित्ताने आज श्रीगोंदा तालुका व शहरातील युवकांचा शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यात आला. शिवसेना (संपर्कप्रमुख) भाऊ कोरगावकर, शिवसेना (जिल्हाप्रमुख) शशिकांत गाडे, युवासेना (संपर्कप्रमुख) संजय साटम, युवा सेना (जिल्हाप्रमुख) रविभाऊ वाकळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रवेश सोहळा पार पडला. Shrigonda .. On the occasion of Minister Aditya Thackeray’s birthday, ShivSena, Yuvasena distributed food grains to 50 needy families ..

(शिवसैनिक) निलेश गोरे, अक्षय खेतमाळीस ज्ञानेश्वर रायकर, विशाल शिंदे, अभय रसाळ, संदिप गवळी, संदिप चाकणे, संकेत लोंढे यांनी शिवसेना तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

https://bit.ly/bspmycityshrigonda

यावेळी उपस्थित (शिवसेना शहर प्रमुख) संतोष खेतमाळीस, (युवा सेना तालुका प्रमुख) हरिभाऊ काळे, (शिवसेना ज्येष्ठ नेते) सुरेश देशमुख, (युवा सेना शहर प्रमुख) ओमकार शिंदे, (युवा सेना तालुका संघटक) नाथा पवार, (युवा सेना विभाग प्रमुख) श्रीराम मस्के, (शिवसैनिक) रोहन मोरे, (शिवसैनिक) अतुल दरेकर, सुशांत काळे, योगेश भुतकर सह सर्व शिवसैनिक, युवासैनिक उपस्थित होते.

स्रोत:(बाळासाहेब दूतारे, शिवसेना)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading