दिनांक १४ जून, श्रीगोंदा:
देशामध्ये कोरोणा-१९ ची मोठ्या प्रमाणामध्ये महामारी चालू आहे. त्यामुळे मागील एक वर्षापासून कंत्राटदार यांचा मोठ्या प्रमाणात रोजगाराचा प्रश्न उद्भवला आहे. त्यातच भर म्हणून, पंचायत समिती सदस्य १५ वा वित्त आयोग निधी मधील कामे ग्रामपंचायत एजन्सी वर टाकून, सदस्यांच्या मर्जीतील लोकांना कामे देण्याचा मनमानी कारभार सुरू आहे. त्यामुळे हा निधी कोणत्याही ग्रामपंचायत एजन्सीला देण्यात येऊ नये.

या निधीचे आपण शासन निर्णयानुसार ३३:३३:३४ या प्रमाणेच वाटप करण्यात यावे. अशी मागणी श्री.प्रशांत काळे (गटविकास अधिकारी) पंचायत समिती श्रीगोंदा यांना निवेदन देऊन करण्यात आली. या मागणीची लवकरात लवकर अंमलबजावणी न केल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे श्रीगोंदा तालुका अध्यक्ष इंजी.गणेश श्रीराम यांनी सांगितले.maharashtra-state-contractors-federation-warns-to-go-to-court
यावेळी (समन्वयक) विजयसिंह गुंड, (सल्लागार) सचिन गायकवाड, (मनसे तालुका अध्यक्ष) अतुल कोठारे, (सदस्य) लालचंद गोरे, संदीप आढाव, शरद पुराणे, निखिल नागवडे, जयदीप मांडे, निलेश गोरे, शेखर गायकवाड, शर्मान शेख, प्रदीप उंडे, सलीम शेख, सचिन भोसले, सागर गोरे, शुभम मोटे उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)
