दिनांक १३ जून,श्रीगोंदा:
तालुक्यात श्रीगोंदा युवक काँग्रेसच्या वतीने निरनिराळे सामाजिक उपक्रम राबवले जात असतात. अशाच एका सामाजिक उपक्रमाद्वारे कोरोना संक्रमण काळात लोकांच्या आरोग्याबाबत सतर्कता दाखवत, कोरोना प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी देण्यात येणारी प्रतिबंधात्मक लस सर्व नागरिकांना उपलब्ध व्हावी. या उद्देशाने, नमूद पदाधिकाऱ्यांनी प्रशांत भैय्या ओगले यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली पुढाकार घेऊन, ऑनलाईन लस रजिस्ट्रेशन मोहीम तालुक्यात राबवण्याचे ठरवले आहे. काल पेडगाव येथे याचा शुभारंभ करण्यात आला.

याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आयोजित, श्रीगोंदा विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने तालुक्यातील संपूर्ण गाव ते गाव ऑनलाईन लस नोंदणी (रजिस्ट्रेशन) मोहिमेस दिनांक १२ जून पेडगावपासून सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी येथील ग्रामस्थांचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला. सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत ५०० च्या आसपास ग्रामस्थांनी या नोंदणी मोहिमेमध्ये सहभाग घेतला. youth-congress-launches-online-vaccine-registration-campaign-in-the-taluka
या कार्यक्रमाचे संपूर्ण नेतृत्व श्रीगोंदा युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. यावेळी (महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव) प्रशांत ओगले, (श्रीगोंदा शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष) योगेश मेहेत्रे, (श्रीगोंदा तालुका काँग्रेसचे सरचिटणीस) मल्लूभाई शेख, (काँग्रेस प्रोफेशनलचे) प्रशांत सिदनकर, पेडगाव गावचे (सरपंच) भगवान आप्पा कणसे, इरफान भाई पिरजादे, शफिक भाई हवालदार, भाऊ गावडे, नितीन खेडकर, विश्वजीत खेडकर, हेमंत झीटे, वैभव झीटे, सुरज राऊत, दादा राऊत, अनिल कणसे, झहीर सय्यद, रोहन झीटे, ओमकार लोखंडे, सचिन जंजिरे, राहुल झीटे, रोहित राऊत, युवराज यादव, ओमकार पवार, आप्पा नवले, गजानन कानडे, विक्रम राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

