पेडगाव-श्रीगोंदा रस्ता रुंदीकरण मागणीला जोर; ग्रामस्थांचा ‘सात मीटर’ साठी मंत्र्यांना इशारा.

दिनांक ७ ऑक्टोबर १०२५,श्रीगोंदा/मुंबई:

पेडगाव-श्रीगोंदा (MDR-62) रस्त्याची रुंदी सात मीटर करण्याची मागणी घेऊन पेडगाव ग्रामस्थांनी आज मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली.

या रस्त्याला ‘जीवनदायी मार्ग’ मानणाऱ्या ग्रामस्थांनी रस्त्याची अपुरी रुंदी आणि दुरवस्था यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत दत्तात्रय ओगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्र्यांना निवेदन सादर केले.

निवेदनात नमूद केले आहे की, सध्या सुरू असलेल्या विकासकामातून ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या पेडगाव गावाला सात मीटर रुंदीकरणातून वगळल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.

७ किमी लांबीचा हा रस्ता अपुरा असल्याने वाहतुकीत अडथळे येत आहेत. ग्रामस्थांच्या हितासाठी व न्याय मिळवण्यासाठी सात मीटर रुंदीकरण आवश्यक आहे.

आमदार मा. विक्रम पाचपूते यांनाही हीच मागणी करण्यात आली आहे. श्री. ओगले यांनी इशारा दिला आहे की, ही मागणी मंजूर न झाल्यास पेडगाव ग्रामस्थ रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडतील.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading