दिनांक २२ जून(शेडगाव,श्रीगोंदा):
श्रीगोंदा तालुक्यात शेडगाव शिवारात पोकलैंन मशिनचे रॉक ब्रेकर चोरी करणारे दोन सराईत अट्टल गुन्हेगार १३,२५,०००/- रुपये किंमती च्या मुद्देमालासह श्रीगोंदा पो. स्टे चे तपास पथकाने ताब्यात घेतले आहेत.
दिनांक १४ मे २० रोजी शेडगाव गावचे शिवारात फिर्यादी संदिप संभाजी पानसंबळ रा. सडे ता. राहुरी यांचे मालकीचे पोकलैंड मशिनचे रॉक ब्रेकरने बंधाऱ्याचे काम चालु होते. मध्यरात्री १२:३० वाजनेच्या सुमारास शेडगाव शिवारात सरकारी बंधाऱ्याच्या चालु कामात फिर्यादीच्या मालकीचे पोकलेनचे रॉक ब्रेकर १३,२५,०००/- रु. किमतीचे पोकलेन ऑपरेटरच्या मदतीने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले होते.
सदर घटनेबाबत श्रीगोंदा पोलिस स्टेशनला गुरनं ४५३/२० भादवि कलम ३८१ प्रमाणे दिनांक १४ मे २० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा गुप्त बातीमारामार्फत पोलीस तपास करीत होते. सदरचा गुन्हा उघडकिस आणने कामी अहमदनगर जिल्ह्याचे(पोलिस अधिक्षक)अखिलेश कुमार सिंह,(अप्पर पोलिस अधिक्षक)सागर पाटील, (उपविभागीय पोलिस अधिकारी) संजय सातव यांनी गुन्हा उघडकिस आणण्यासाठी सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे (पोलिस निरीक्षक) दौलतराव जाधव यांनी गुन्हे प्रगटीकरण पथकास मार्गदर्शन केले होते.
त्यानुसार दिनांक २२ जून २० रोजी श्रीगोंदा पोलिस स्टेशन शाखेचे सपोनि सानप यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, सदरचा गुन्हा हा दाऊद शमशुद्दीने शेख रा. कोरेगाव ता. श्रीगोंदा याने पोकलेनचे ऑपरेटर व त्याचे अन्य साथीदारांनी मिळुन केला असल्याची खात्रीलायक बातमी मिळाल्याने, तपास पथकाचे सपोनि राजेंद्र सानप, पोहेका अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ संजय काळे, पोकॉ गोकुळ इंगावले, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादा टाके, पोकॉ प्रताप देवकाते, पोकॉ योगेश सुपेकर यांनी दाऊद शमशुद्दीने शेख यास कोरेगाव येथुन शिथापिने सापळा रचुन ताब्यात घेत त्याच्याकडे वरिल प्रमाणे दाखल गुन्ह्याबाबत चौकशी केली असता,त्याने गुन्हा केल्याचे कबुल केला.
तसेच, सांगितले कि, सदरचा गुन्हा त्याने व त्याचा मित्र पप्पु उर्फ रविंद्र देवीदास राऊत रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा, भांबड्या उर्फ अहमद शेख रा. पिंपळगाव तुर्क, ता. पारनेर अशांनी मिळुन पोकलेन ऑपरेटर उमेश प्रसाद व हेल्पर मनोज कुमार दोन्ही रा. झारखंड यांचेशि संगणमत करुन केला असल्याची कबुली दिली.
या गुन्ह्यातील चोरुन नेलेले २३,२५,०००/- रु. किंमतीचे पोकलेनचे रॉक ब्रेकर पिपंळगाव तुर्क ता. पारनेर येथुन दोन पंचासमक्ष काढुन दिले आहे. सदर आरोपींचे ताब्यात वरिल प्रमाणे दाखल गुन्ह्यातील चोरी गेलेला माल मिळुन आला असुन तो गुन्ह्याचे तपासकामी पोलिसांनी जप्त केला आहे.
दोन आरोपी गुन्ह्यामधे अटक केले असुन, यापुर्वी केलेल्या गुन्ह्यांची कबुली त्यांनी दिली आहे. आरोपी दाऊद शमशुद्दीने शेख रा. कोरेगाव, ता. श्रीगोंदा याचेवर
१.श्रीगोंदा पो.स्टे गुरनं ४५३/२० भादवि कलम ३८१ प्रमाणे,
२.श्रीगोंदा पो.स्टे गुरनं ३९/२० भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे,
३.बेलवंडी पो.स्टे गुरनं ५४०/२० भादवि कलम ३७९ प्रमाणे,
४.पारनेर पो.स्टे गुरनं ९०२/१९ भादवि कलम ३७९, ४२७, ३४ प्रमाणे,
५.पारनेर पो.स्टे गुरनं २०७/२० भादवि कलम ३७९ प्रमाणे,
६.वडगाव मावळ पो.स्टे गुरनं १७/२० भादवि कलम ३७९ प्रमाणे,
७.वडगाव मावळ पो.स्टे गुरनं ३७/२० भादवि कलम ३७९ प्रमाणे,
८.सोनई पो.स्टे गुरनं १२/१८ भादवि कलम ३९४, २०१, ३४ प्रमाणे,
९.शेवगाव पो.स्टे गुरनं २६१/१४ भादवि कलम ३७९, ४२७, ३४ प्रमाणे,
१०.नगर तालुका पो.स्टे गुरनं ७२/१८ भादवि कलम ३९४, ३४ प्रमाणे,
११.नगर तालुका पो.स्टे गुरनं ७३/१८ भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे,
१२.नगर तालुका पो.स्टे गुरनं १४/१८ भादवि कलम ३७९,३४ प्रमाणे,
१३.भिंगार कॅम्प पो.स्टे गुरनं ३३९/१८ भादवि कलम ३७९,४१४,४११,३४ प्रमाणे,
१४.भिंगार कॅम्प पो.स्टे गुरनं ३४३/१८ भादवि कलम ३९९, ४०२, ४३९ प्रमाणे,
१५.भिंगार कॅम्प पो.स्टे गुरनं २१/१७ भादवि कलम ४२०, ४०६ प्रमाणे,
१६.दिघी पो.स्टे पुणे गुरनं १६७/१५ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. तर,
आरोपी पप्पु उर्फ रविंद्र देवीदास राऊत रा. आढळगाव,ता.श्रीगोंदा याचेवर
१.श्रीगोंदा पो.स्टे गुरनं ४५३/२० भादवि कलम ३८१ प्रमाणे,
२.श्रीगोंदा पो.स्टे गुरनं ३९/२० भादवि कलम ३७९, ३४ प्रमाणे,
३.बेलवंडी पो.स्टे गुरनं ५४०/२० भादवि कलम ३७९ प्रमाणे,
४.पारनेर पो.स्टे गुरनं ९०२/१९ भादवि कलम ३७९, ४२७, ३४ प्रमाणे,
५.पारनेर पो.स्टे गुरनं १०७/२० भादवि कलम ३७९ प्रमाणे,
६. वडगाव मावळ पो.स्टे गुरनं १७/२० भादवि कलम ३७९ प्रमाणे,
७.वडगाव मावळ पो.स्टे गुरनं ३७/२० भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्ह्यात चोरी गेला मुद्देमाल मिळुन आला असुन,दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचेकडुन आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.
सदरची कारवाई (पोलिस अधिक्षक) अखिलेश कुमार सिंह, (अप्पर पोलिस अधिक्षक) सागर पाटील,(उपविभागीय पोलिस अधिकारी) संजय सातव (पोलिस निरीक्षक) दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनेप्रमाणे श्रीगोंदा तपास पथकाचे सपोनि राजेंद्र सानप, पोहेका अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ संजय काळे, पोकॉ गोकुळ इंगावले, पोकॉ अमोल कोतकर, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ दादा टाके, पोकॉ प्रताप देवकाते, पोकॉ योगेश सुपेकर यांनी केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोनि जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, श्रीगोंदा पो.स्टे चे सपोनि राजेंद्र सानप सह पोहेकॉ आर. बी. झुंजार हे करित आहेत.
(स्रोत:श्रीगोंदा पोलीस)
