जबरी चोरीतील गुन्हेगार ताब्यात घेत,२५ हजार किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र हस्तगत,श्रीगोंदा पोलीसांची कामगिरी.

दिनांक ५ जून (हिरडगाव,श्रीगोंदा):

हिरडगाव येथील फिर्यादी श्रीहरी भिमराव सकुंडे यांची आई दिनांक ४ एप्रिल २० रोजी १२/४५ वा चे सुमारास राहते घराच्या पडवीत झोपलेली असताना, त्यांच्या गळ्यातील २५ हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र अज्ञात चोराने हिसकावुन पळुन गेला होता. या त्यांच्या फिर्यादिवरुन श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गु. र. नं. ३२२/ २०२० भा. द. वि. क. ३९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आज दिनांक ५ जून रोजी पो.नि.दौलतराव जाधव यांना माहीती मिळाली की, तालुक्यातील आढळगाव येथे एक ईसम चोरीच्या गुन्ह्यातील सोन्याचे दागीने विक्री करण्याकरीता येणार आहे. त्यावरून पो.नि. जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि राजेंद्र सानप, सपोनि विठ्ठल पाटील, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ रवी जाधव, पोकॉ संजय काळे, पोकॉ किरण भापकर यांनी सापळा लावुन,आढळगाव येथुन गणेश शिवाजी काळे वय ३० वर्षे रा.तांदळी दुमाला ता.श्रीगोंदा यास ताब्यात घेवुन, त्याची अंगझडती घेतली.त्याच्याकडे २५००० किमतीचे मंगळसुत्र मिळुन आले असल्याचे, पोलिसांनी माध्यमाना प्रसिद्धीस दिले आहे.

तपासात त्याने हिरडगाव बेंदवस्ती येथुन सदर सोन्याचे मंगळसुत्र चोरी केल्याची कबुली दिल्याने त्यास नमुद गुन्ह्यात अटक करुन, मंगळसुत्र हस्तगत करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपीवर..

१)श्रीगोंदा पो.स्टे.- गु.र.नं. ९८/२०१६ भा. द. वि. क. ३९९,

२)श्रीगोंदा पो.स्टे.- गु.र.नं.३१२/२०२० भा. द. वि. क. ३९२,

३)श्रीगोंदा पो.स्टे.- गु.र.नं. १२२/२०१० भा. द. वि. क. ३९५, ३९६, वगैरे,

४)कर्जत पो.स्टे.- गु.र.नं. १००/२०१६ भा. द. वि. क. ३९४, ३४ नुसार गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई (पोलीस अधिक्षक) अखिलेश कुमार सिंह, (अप्पर पोलीस अधिक्षक) सागर पाटील, (उपविभागीय पोलीस आधिकारी,कर्जत विभाग) संजय सातव, (पोलीस निरीक्षक) दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली (सपोनि) राजेंद्र सानप, (सपोनि) विठ्ठल पाटील, (पोहेकॉ) अंकुश ढवळे, (पोकॉ) किरण बोराडे, (पोकॉ) रवी जाधव, (पोकॉ) संजय काळे, (पोकॉ) किरण भापकर यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading