कोरोना संक्रमित काळात पत्रकारांनी केलेल्या कामगिरीबद्दल,अग्निपंख फाऊंडेशन’तर्फे सन्मान..

दिनांक ५ जुन,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यासह शहरात कोरोणा संक्रमण काळात कमीत कमी रुग्ण निदर्शनास आले. तालुक्यातील काही भागात प्रादुर्भाव क्षेत्रातून स्थलांतर करत गावी आल्याने कोरोनाचा शिरकाव शहरांपासून गावांपर्यंत झाला. रुग्ण निदर्शनास येण्यापूर्वी स्थानिक प्रशासनाचे प्रमुख तहसीलदार, पोलीस निरीक्षक व आरोग्य विभागाच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कोरोनाला तालुक्याच्या सीमेवर रोखण्यात यश आले होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरी एवढिच जिम्मेदार कामगिरी पत्रकारांनी बजावल्याचे मत प्राध्यापक तुकाराम दरेकर यांनी अग्निपंख फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केले आहे.

कोरोणा प्रादूर्भाव कालखंडामध्ये स्थानिक प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून, सर्व वार्तांकन समाजापर्यंत किंवा जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम येथील पत्रकारांनी केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कामगिरी बद्दल अग्निपंख फाउंडेशनच्या वतीने नमूद पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुडके महाराज होते. तर, प्राध्यापक तुकाराम दरेकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अग्निपंख फाऊंडेशनचे विश्वस्त गोरे सर यांनी यावेळी उपस्थितांचे आभार मानले.

प्रमुख भाषणामध्ये प्रा.तुकाराम दरेकर यांनी आपले मनोगत मांडले असून, पत्रकारांना शासनामार्फत मानधन मिळत नसल्याने आपण शासन दरबारी याविषयी पाठपुरावा करणार असल्याचे विशेष नमूद केले आहे. कोरोणा रोखण्यासाठी स्थानिक प्रशासना इतकीच पत्रकारांनीही तसदी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीगोंद्यातील पत्रकार निर्भीडपणे आपली भूमिका मांडत असून, यापुढेही सामान्य प्रवर्गासाठी काम करीत आपल्या भूमिकेवर ठाम राहिले पाहिजे. असे मत प्राध्यापक दरेकर यांनी व्यक्त करीत पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

नमूद कार्यक्रमांमध्ये सोशल डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळण्यात आले. यावेळी तालुक्यातील विविध भागात काम करणारे पत्रकार उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने पंकज गणवीर, रामदास कोळपे, विशाल चव्हाण, आरिफ शेख, (मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष) अंकुश शिंदे, शिवाजी साळुंखे, अंकुश तुपे, दादा सोनवणे, मुस्ताक पठाण, शकील भाई शेख, राज मोहम्मद शेख, योगेश चंदन, राजेंद्र राऊत, गणेश गाडेकर, विजय थोरात, गणेश जेवरे, समीरन नागवडे, सुभाष शिंदे, अमोल गव्हाणे, बाळासाहेब काकडे, केके कुलकर्णी, गणेश कविटकर, उत्तम राऊत सह नानासाहेब जठार यावेळी उपस्थित होते. सर्वांना अग्निपंख फाउंडेशन’ने “कोरोना योद्धा” असे सन्मानपत्र देत सन्मानित केले आहे.

अरिफ शेख यांनी सर्व पत्रकारांच्या वतीने अग्निपंख फाउंडेशन च्या बाळासाहेब काकडे, अमोल गव्हाणे व गोरे सर यांचे आभार मानले असून, सुडके महाराज यांनी पत्रकारांना यावेळी मार्गदर्शन केले आहे.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदन गडदे यांनी केले व कार्यक्रम संपन्न झाला.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading