MHT-CET परीक्षा केंद्र बदलण्याची ऑनलाइन परवानगी मिळाली.राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय अनभुले यांनीही केली होती मागणी..

दिनांक ४ जून,श्रीगोंदा:

MHT-CET ची परीक्षा येणाऱ्या काही दिवसांत होणार आहे. ही परीक्षा महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी दरवर्षी देतात.या परीक्षेच्या तयारी करण्यासाठी हजारो ग्रामीण भागातील विद्यार्थी हे क्लासेस साठी क्रॅश कोर्ससाठी पुणे, लातूर, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर, कोल्हापूर आदी सारख्या मोठ्या शहरात जातात. परंतु, आताच्या काळात जे कोरोनाचे संकट जे जगावर ओढवले आहे.त्यामुळे या मोठ्या शहरात असणारे क्लासेस, क्रॅश कोर्स हे बंद आहेत.त्यामुळे तेथे शिकण्यास असणारे CET चे विद्यार्थी हे आपआपल्या घरी आलेले आहेत. परंतु, त्यांचे MHT-CET परीक्षेचे केंद्र हे ज्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांनी क्लासेस क्रॅश कोर्स लावले होते. त्याच शहरातील परीक्षा केंद्र टाकले होते.आता कोरोनामुळे जो लॉकडाऊन आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना त्या त्या शहरात जाणे कठीण झाले आहे आणि विद्यार्थ्यांच्या मनातही एक भीती निर्माण झाली होती.

ही बाब राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अक्षय अनभुले यांच्या लक्षात येताच, त्यांनी MHT-CET चे परीक्षा केंद्र हे NEET परीक्षेप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने बदलण्याची मागणी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि MHT-CET CELL कडे वेळोवेळी केली होती. तसेच, श्रीगोंदा दौऱ्यावर राज्यमंत्री तनपुरे आले असता, अनभुले यांनी मंत्री महोदय यांना भेटून या विषयावर सविस्तर चर्चा केली आणि MHT-CET च्या विद्यार्थ्यांची अडचण समजून सांगितली होती.

आज थोड्यावेळापूर्वी MHT-CET CELL ने या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्याची ऑनलाइन पद्धतीने परवानगी दिली आहे.यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे.परीक्षा केंद्र बदलण्याची अंतिम तारीख १० जून २०२० असून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने आपल्याला सोईस्कर जिल्ह्याच्या ठिकाणचे परीक्षा केंद्र निवडावे. ही मागणी मान्य झाल्यामुळे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी राज्य सरचिटणीस अक्षय अनभुले यांचे राज्यातील विद्यार्थ्यांतर्फे आभार व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading