दिनांक १ फेब्रुवारी श्रीगोंदा:
तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेती पंपाची बिल आकारणी तात्काळ थांबावावी, यासाठी कोळगाव येथील ग्रामपंचायत सदस्य व (माजी सभापती, पंचायत समिती) पुरुषोत्तम लगड यांनी स्थानिकांसह उपोषण सुरू केले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मागील काही दिवसांमध्ये कोरोनामुळे तसेच नंतरच्या कालावधीमध्ये सततच्या पावसामुळे होणारे नुकसान पाहता, शेतकरी अडचणीत आला असून, पूर्णपणे हवालदिल झाला असल्याचे लगड यांनी निवेदनात नमूद केले आहे. त्यातच वीज वितरण कंपनी मार्फत शेतकऱ्यांच्या शेतीच्या वीज पंपाची बिल आकारणी चालू आहे. यामुळे अधिक आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांकडून सदर वीज बिल आकारणी तात्काळ थांबवावी व शेतकऱ्यांनां सहकार्य करावे. अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
सदर विषयी शेतकऱ्यांच्या शेती विज पंपाच्या बिला संदर्भात होणारी आकारणी न थांबल्यास, आजपासून उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी निवेदन सादर केले होते. त्या अनुषंगाने आज श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर पीडित शेतकऱ्यांच्या वीज बिला संदर्भात पुरुषोत्तम लगड यांनी उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी केशव(भाऊ) मगर, दीपक भोसले पाटील, (संभाजी ब्रिगेडचे, जिल्हाध्यक्ष) टिळक भोस, सतीश डेबरे, रामभाऊ पोटे, शंकर कोठारीसह ग्रामस्थ, शेतकरी, पदाधिकारी उपस्थित होते.
स्रोत:(शेतकरी वीज बिलासाठी चालू असलेले पुरुषोत्तम लगड यांचे उपोषण)
