दिनांक १४ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
श्रीगोंदा तालुक्यात अत्याधुनिक सोयी, सुविधा युक्त रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे अनेक रुग्णांची हेळसांड होत असून, एक अत्याधुनिक सोयी, सुविधा युक्त रुग्णवाहिका श्रीगोंदा तालुक्याला मिळावी. अशी मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष बाळासाहेब दुतारे यांनी ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकतीच केली आहे.

ना. एकनाथ शिंदे यांनी आपल्या जन्मदिवसाच्या निमित्ताने ठाणे येथे १०० रुग्णवाहीकांचे नुकतेच लोकार्पण केले. त्याचा सर्व शिवसैनिकांना सार्थ अभिमान असून, या प्रकारची एक अत्याधुनिक सोयी व सुविधांयुक्त रुग्णवाहिका श्रीगोंद्यास द्यावी. अशी मागणी शिवसेना तालुकाध्यक्ष बाळासाहेब दुतारे व शिवसैनिकांनी ना.शिंदे यांना निवेदन देऊन मागणी केली आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्र माध्यमांना दिले आहे.
स्रोत:(बाळासाहेब दूतारे यांनी प्रसिद्धीस दिलेली माहिती)
