भारतीय जनता पार्टी श्रीगोंदा तालुका जम्बो कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून,यामध्ये ७ उपाध्यक्ष,७ सरचिटणीस,७ चिटणीस,१ कोषाध्यक्ष, ३ कार्यालयीन चिटणीस,१ प्रसिद्धी प्रमुख,सह विविध आघाड्यांचे अध्यक्ष,२२ कार्यकारणी सदस्य असा एकूण १८५ जणांचा समावेश असल्याची माहिती तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी दिली.
यामध्ये सर्वच नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा मेळ घालून, काहीना पुन्हा संधी देण्यात आलेली असून, बहतांश जणांना नव्याने संधी देण्यात आलेली आहे.
(उपाध्यक्ष):
महाडिक सुनील रघुनाथ,शेख मिठुभाई गुलाब,पंधरकर बंड आण्णासाहेब,हिरवे सावता लक्ष्मण,जंगले निळकंठ भिमराव,बारगुजे बाबासाहेब सदाशिव,म्हस्के अनिल रपुनाथ.
(सरचिटणीस):
जगताप दत्तात्रय गेनबा,शिदे दीपक रामदास,ईश्वरे अशोक शानदेव,गुंजाळ विश्वास विष्ण,क्षिरसागर संतोष रामदास, मोणकर दिलीपकुमार उर्फ बंडू, हिरणावळे दिपक दत्तात्रय.
(अल्पसंख्याक शहर युवक मोर्चा): पटवा गौतम प्रकाशनाल.
(भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष): चितळकर भगवान माणिक.
(अपंग आघाडी अध्यक्ष): क्षिरसागर नारायण अर्जुन.
(जेष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष): पाटील रंगराव बाबुराव.
(प्रजा आघाडी अध्यक्ष): मापारे प्रवीण वाल्मिक. कार्यकारणी निवडताना सर्वांचाच आदर करून तरुण व नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी देण्यात आलेली आहे. तालुकाध्यक्ष नागवडे म्हणाले कि, श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री.बबनराव पाचपुते,यांचे मार्गदर्शनाखाली सर्व समावेशक कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.यामध्ये ज्यांना संधी मिळाली नसेल त्यांनाही इतर ठिकाणी संधी देण्यात येईल.निवडीबद्दल सर्वांचे याठिकाणी आभार मानत पुढील वाटचाली – साठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.