मढेवडगाव मध्ये शिवजयंती निमित्त केला लष्करातील जवानांचा सन्मान…
01 mins
मढेवडगाव मध्ये शिवजयंती निमित्त केला लष्करातील जवानांचा सन्मान…
दिनांक २२ फेब्रुवारी,मढेवडगाव,श्रीगोंदा:
मढेवडगाव मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९० वी जयंती दिनांक २१ फेब्रुवारी रोजी मोठ्या उस्ताहात पार पडली. मढेवडगाव मधील अनेक तरुणांनी एकत्र येऊन महापुरुष जयंती उस्तव समितीच्या माध्यमातुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले.गावामध्ये सकाळ पासूनच घरोघरी रांगोळी स्पर्धा, आणी शिवनेरी ते मढेवडगाव पायी शिव ज्योतीचे स्वागत करून,शिव प्रतिमेचे पूजन झाले.यामुळे सर्व शिवभक्तांमध्ये वातावरण उस्ताही झाले होते.दुपारी घोडे-उंट आणी भगवे झेंडे व डोल ताशांच्या गजरात भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.विशेष म्हणजे घोड्यावर राजमाता राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ आणी छत्रपती शिवराय होते.सर्व शिवभक्तांचे ग्रामस्थांनी रांगोळी काढून स्वागत केले.अनेकांचे लक्ष या भव्य मिरवणूकीने वेधले होते. मिरवणूक पार पडल्यानंतर लष्करातील जवानांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.त्याच बरोबर सौ.शिवमती राजश्रीताई राठोड यांच्या शिव व्याख्यानाने मढेवडगाव मधील ग्रामस्थ व शिवभक्त मंत्रमुक्त व प्रेरित झाले.जयंती उत्सव समितीने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सव कार्यक्रमात शिवरायांच्या स्वप्नातील गाव असा उल्लेख करावा,असे श्रीगोंदा तालुक्यातील मढेवडगाव हे गाव सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्रित घेऊन एक विचाराने असणारे निश्चितच कौतुक करण्यास पात्र ठरत आहे.कार्यक्रमाची सांगता स्नेह भोजनाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नंदिनी काकी वाबळे होत्या.या कार्यक्रमाची प्रस्तावना श्री.राहुल साळवे यांनी केले व सूत्रसंचलन प्राध्यापक गोरख उंडे सर यांनी केले.हा कार्यक्रम पूर्ण होण्यासाठी महापुरुष जयंती ऊस्तव समितीच्या सदस्या प्रा.योगेश मांडे, अक्षय ससाणे,संतोष मांडे,सचिन शिंदे,विशाल मांडे, निखिल ईरोळे,केतन साळवे,अनिकेत मांडे,सुधीर गाडे,जावेद तांबोळी,शहाजी शिंदे,प्रवीण पवार,अनिल मोहिते,अजय मांडे,आनंदा ससाणे,सूरज आग्रे,प्रमोद शिंदे,संग्राम शिंदे,कार्यक्रमाचे आभार अभय गुंड यांनी मानले.