बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक करणारा आरोपी अन्सार शेख अटक.

बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक करणारा आरोपी अन्सार शेख अटक.स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..

दिनांक २२ फेब्रुवारी,श्रीगोंदा:
तालुक्यातील अंजनाबाई भिकाजीराव ढमढेरे ट्रस्टची बेलवंडी बु।। व लोणी व्यंकनाथ येथील जमिनीचे बनावट कागदपत्रे तयार करून,त्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा मुख्य आरोप मागे गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार होता.मात्र त्याला पकडण्यास एलसीबीला यश आले आहे. अन्सार मुनीर शेख असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील फसवणूक प्रकरणातील मुख्य आरोपी माळीवाडा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपास केला असता, शेख याचा शोध घेऊन त्याला पकडण्यात आले. ही कारवाई नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या केली.
तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अश्या बनावट दस्तावेजांच्या आधारे खरेदी केलेली प्रकरने मूळ मालकांनी फिर्याद दिल्यावर उघड झाली आहेत. गावठाण क्षेत्रावर,शासकीय जागेवर हक्क दाखवीत किंवा बऱ्याच दिवसापासून कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या लोकांच्या जमिनीवर डोळा ठेऊन अनधिकृत रित्या बनावट कागदपत्रे बनवून जमिनी लाटण्याचा नवा उपक्रम सध्या श्रीगोंदा तालुक्यात चालू होता.मात्र मुख्य मालकांच्या लक्षात आल्यावर त्यांच्या फिर्यादी नंतर हा विषय ऐरणीवर आला आहे.
सामान्य दलालां बरोबर प्रशासकीय यंत्रणा ही या प्रक्रियेत सामील आहे.हे विसरून चालणार नाही.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading