विद्यार्थ्यांनी दैववादी न होता प्रयत्नवादी व्हावे : चव्हाण.

विद्यार्थ्यांनी दैववादी न होता प्रयत्नवादी व्हावे : चव्हाण.

दिनांक २३ फेब्रुवारी(काष्टी,श्रीगोंदा):
विद्यार्थ्यांनी दैववादी न होता प्रयत्नवादी व्हावे.असे प्रतिपादन प्रशांत चव्हाण (सर) यांनी केले.रयत शिक्षण संस्थेचे जनता कन्या विद्यालय काष्टी येथे आयोजीत केलेल्या इ .१० वी च्या विद्यार्थिनींचा निरोप समारंभ कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून,बोलत होते.
ते म्हणाले,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्था निर्माण करीत असताना दैववादाचा वापर न करता,सत्यशोधक तत्वांचा वापर करून ते प्रयत्नवादी झाले व सत्यशोधून बहुजन समाजासाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.त्यामुळे,रयत मधील विद्यार्थी हा प्रयत्नवादीच असला पाहिजे असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ.मंजुषा चावरे होत्या. प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील व रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांचे प्रतिमा पूजन सौ. वैशाली (ताई )पाचपुते यांचे हस्ते करण्यात आले.या वेळी शिवजयंती निम्मित आयोजित वक्तृत्व व निबंध स्पर्धेचा निकाल व यशस्वी विदयार्थ्यांचा सत्कार गुरुकुल प्रमुख श्री.गोरे सर व क्रिडा विभाग प्रमुख खामकर व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिंदे बी.आर.यांनी आमले मनोगत व्यक्त केले. यावेळी मंचकावर सुयश कम्प्युटरच्या संचालकी सौ.पाचपुते मॅडम व ओम कम्प्युटर च्या संचालिका सौ.पठारे मॅडम,विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री.पवार सर, जोगदंड सर इ.मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून सौ.वैशाली (ताई) पाचपुते यांनी विद्यालयास ५००० रू देणगी दिली. सूत्रसंचालन कु.गवळी सृष्टी,काटे नुतन तर उपस्थित मान्यवरांचे आभार बोत्रे गायत्री हीने मानले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading