संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा छत्रपतींकडून घ्यावी.प्रा.कानिफनाथ उगले.

संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा छत्रपतींकडून घ्यावी.प्रा.कानिफनाथ उगले.

बेलवंडीत इंदिरा गांधी तंत्रनिकेतनमध्ये शिवजागर.

दिनांक २३ फेब्रुवारी(बेलवंडी,श्रीगोंदा) :
शिवरायांच्या इतिहासातून भविष्य घडविण्याची प्रेरणा आणि नाविन्य निर्माण करण्याचा विचार तरुणांनी करावा,शिवरायांची जनतेशी नाळ होती. कोणताही धार्मिक द्वेष त्यांनी बाळगला नाही.महिलांचा सन्मान कसा करावा हे ते शिकवुन गेले.शिवजयंती साजरी करत असताना आज तरुणांनी संकटसमयी हताश, निराश न होता मोठ्या आत्मविश्‍वासाने संकटांविरुद्ध लढण्याची प्रेरणा शिवचरित्रातून घ्यावी.छत्रपती शिवाजी महाराजांचा स्री सन्माचा आदर्श तरुणाईने घ्यावा.असा सल्ला युवा व्याख्याते प्रा.कानिफनाथ उगले यांनी दिला.
बेलवंडी शुगर येथील इंदिरा गांधी तंत्रनिकेतनमध्ये ‘उठ तरुणा जागा हो,शिवचरीत्राचा धागा हो’ या विषयावर उगले यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य.संजयकुमार गोरे यांनी केले. अध्यक्षस्थानी मा.सभापती अरुणराव पाचपुते होते. नागवडे कारखान्याचे संचालक विलासराव काकडे, मुंबई मार्केट कमिटी संचालक बाळासाहेब नाहाटा, अशोकराव काळाने,माजी पंचायत समिती सभापती मनीष जगताप,संग्राम पवार,ज्ञानदेव मगर,किरण इथापे, बंडू खंडागळे, सुभाष मस्के,सुधीरराव काळाने,संभाजीराव काळणे, संजय डाके, रामदास लबडे उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा कोणत्याही व्यक्तिगत लाभासाठी नव्हता,तर तो परिवर्तनासाठी होता. सर्व मानवी अधिकार नाकारलेल्या जनतेला सन्मानाने जगता यावे यासाठी स्वराज्य गरजेचे होते. त्यामुळे रयतेच्या मानसिकतेत बदल करून महाराजांनी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील गुलामगिरी मोडून काढली. समता, बंधुता स्थापित केली. शिवरायांचे कार्य म्हणजे शहाजीराजे व जिजाऊंचे विचार कृतीत आणणारे शिवकार्य होते.
सूत्रसंचालन प्रा.प्रशांत भोईटे यांनी केले,आभार प्रा.संजीव कदम-पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विभागप्रमुख प्रा.संदीप नातू,प्रा.अब्दुल हवलदार,प्रा.सोमनाथ गुंजाळ, प्रा.राजेंद्र घुले,प्रा. अजय इथापे,प्रा.बिपिन इथापे, प्रा.मिलिंद शेलार सर्व शिक्षक,शिक्षकेतर सेवक, शिवजयंती उत्सव समिती यांनी प्रयत्न केले.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading