मेलेलं पाणी:अशोक व्हटकर.

पुस्तकाची समीक्षा:

मेलेलं पाणी अशोक व्हटकर ‘ मेलेलं पाणी ‘ ही कादंबरी , चांभारांना कातडी पुरविणा – या ढोरजमातीसंबंधी आहे.गावाबाहेरचे उपेक्षित जीवन जगणाऱ्या अनेक जमातींपकी ही एक जमात . धरणाच्या तळाशी साचून राहणाऱ्या ‘ डेड वॉटर ‘ प्रमाणे समाजमनात साकळलेले जातिपातीचे , स्पृश्यास्पृश्यतेचे आडमुठे विचार अनेकांची आयुष्यं उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात . अशाच एका यल्लाप्पा ढोराच्या , त्याचे कुटुंब आणि त्याची जमात यांच्या वेदना प्रा . अशोक व्हटकर यांनी या कादंबरीत चित्रित केल्या आहेत .
त्यानिमित्ताने माणसामाणसातील नात्यांचा अनेकपदरी शोधही त्यांनी घेतला आहे.पाण्यासारख्या जीवना – वश्यक गोष्टींसाठी देखील या जमातीला नाडलं जातं . गावातल्या अधिकारीवर्गाला हवी असतात ती केवळ त्यांची मतं , शेरशेर तांदुळाच्या मोबदल्यात . बापूसारखा या जमातीतला सुशिक्षित तरूण याविरुद्ध आवाज उठवतो.नव्या विचारांनी सळसळून उठतो . आपल्या जमातीतल्या मेलेल्या मनांना जाग आणु पहातो . पण सर्व आघाड्यांवर त्याची निराशाच होते . त्याचे हात अपुरे पडतात . बापूसारखे उमदे हात हीच या जमातीची गरज आहे.याची भेदक जाणीव या कादंबरीतून अशोक व्हटकरांनी करून दिलेली आहे .

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading