अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.

अल्पवयीन शाळकरी विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.

दिनांक २३ फेब्रुवारी वडाळी,श्रीगोंदा:
तालुक्यातील वडाळी येथील इयत्ता १० वीत शिकत असलेल्या अल्पवयीन मुलीने काल दिनांक २२ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० च्या दरम्यान घराच्या शेजारी शेतातील आंब्याच्या झाडाला अंगातील जर्किनने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की,श्रीगोंदा तालुक्यातील वडाळी येथील हारून सय्यद यांची इय्यता १० च्या वर्गात शिकत असलेली मुलगी नाझिया हिने आत्महत्या केली आहे. काल दिनांक २२ फेब्रुवारी रोजी घरात सर्व जेवण करण्यासाठी बसले असता,नाझिया तेथे नव्हती, घरातील सर्वांनी तिला शेजारच्यांकडे पाहिले मात्र,ती तेथेहि आढळली नाही.त्यामुळे घरातल्यांनी आसपास पाहण्यास सुरवात केली.तर,त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला तिने जर्किनच्या सहाय्याने गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आली.
यानंतर,घरच्यांनी सदर घटनेची श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये माहीती देत मृतदेहास खाली उतरून घेतले. दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा पोस्टेमध्ये अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून. घटनास्थळी पोलीस हवालदार झुंजार व पोलीस कॉन्स्टेबल भापकर तपास करीत आहेत.मयताचे आज सकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील तपास (तपास अधिकारी)झुंजार पाहणार असल्याचे समजते आहे.सदर मयत मुलगी श्रीगोंदयात शिक्षण घेत होती.शिवाय तिचा दोन दिवसापूर्वी इयत्ता १० विचा निरोप समारंभाचा कर्यक्रम झाल्याची चर्चा याठिकाणी ऐकण्यात आली.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading