श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टीची व्हर्च्युअल रॅली संपन्न :- भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे.

दिनांक १५ जून,श्रीगोंदा :

श्रीगोंदा तालुका भारतीय जनता पार्टीची व्हर्च्युअल रॅली आज राज्याचे माजी अर्थमंत्री व विद्यमान आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रमुख उपस्थितीत ऑनलाईन व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन माऊली निवास संपर्क कार्यालय श्रीगोंदा येथे ऑनलाईन प्रक्षेपन करण्यात आले. यावेळी आमदार बबनराव पाचपुते यांचे सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

या सदरच्या ऑनलाईन रॅलीत मुनगंटीवार यांनी मोदी सरकारने जनतेसाठी केलेल्या ३७० कलम, तिहेरी तलाक. राम मंदिर, नागरिकत्व सुधारणा कायदा, पिकांच्या आधार भूत किंमतीत केलेली वाढ, कोरोना संकटात संपूर्ण देशात नागरिकांना मोफत केलेला अन्न धान्य पुरवठा, तसेच केंद्र सरकार कडून माता,भगिनींना तीन महिने मोफत गॅस सिलेंडर, जनधन खात्या अंतर्गत सर्व खातेधारकांना केलेली मदत, पी एम किसान योजने अंतर्गत केलेली मदत, देशातील नागरिकांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी २० लाख कोटी रुपयांची केलेली मदत.या सर्व योजनेसह इतर हि योजनांची माहिती देऊन सदरच्या सर्व योजनांचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.तसेच कोविड- १९ या आजारामुळे राज्यात निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत भारतीय जनता पार्टी कडून सतत पाठपुरावा करून सदरचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

या ऑनलाईन रॅलीत कार्यकर्त्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नाना स्वतंत्र वेळ देऊन अतिशय समाधानकारकपणे उत्तरे दिली. प्रत्येकाने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशा प्रमाणे आत्म निर्भर बनून समाजाला ही मदत करण्याच्या सूचना दिल्या व ही भारतीय जनता पार्टीची समाजाप्रति व देशा प्रती असणारी संस्कृती जतन करण्याचा मौलिक सल्ला दिला.आमदार बबनराव पाचपुते यांनी हि काही मार्गदर्शक सूचना करून ऑनलाईन रॅलीस संबोधित केले.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संदीप नागवडे यांनी प्रास्तविक केले व भाजपा महिला कार्याध्यक्षा सौ. अनुजा गायकवाड यांनी आभार मानले. या रॅलीत युवा नेते विक्रमसिंह पाचपुते, गटनेते बापूशेठ गोरे उपनगराध्यक्ष अशोकराव खेंडके, महिला तालुका अध्यक्षा सौ.सुहासिनी गांधी मार्केट क.संचालक सतीशशेठ पोखरणा, नगरसेवक संतोष खेतमाळीस, शहाजी खेतमाळीस, संतोष क्षिरसागर, अंबादास औटी, सुधीर खेडकर, नंदूकुमार लाढाने , भाजपा सरचिटणीस दीपक शिंदे, राजेंद्र उकांडे, दीपक हिरनावळे, उमेश बोरुडे, रोहित गायकवाड, गणेश आढागळे , नानाभाऊ लोखंडे , पंडित अनभुले, भगवानराव वाळके, आबासाहेब दांगडे सह एम टी दरेकर उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading