श्रीगोंद्यात विविध मागण्यांसाठी वेगवेगळे उपोषण…

दिनांक १५ जून,श्रीगोंदा:

श्रीगोंदा तालुक्यातील विविध गावांमधील निरनिराळे प्रश्न घेऊन अनेक पीडित,श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते. सुमारे पाच विविध ठिकाणचे उपोषणकर्ते तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आपले प्रश्न मांडण्यासाठी पावसातही उपस्थित होते.

पिसोरे खांड येथील बहुजन समाज पार्टीचे जिल्हा पदाधिकारी सुनील ओहोळ हे पिसोरेखांड ते कोसेगव्हाण या तालुक्यातील गावांमध्ये डोंगरावरती माती माफिया पोकलेन आणि डंपर च्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन करत असलेल्याने या अनधिकृत उत्खननाच्या विरोधात व श्रीगोंद्याचे तहसीलदार आणि वन परिक्षेत्र अधिकारी यांच्या निषेधार्थ आज तहसील कार्यालयासमोर उपोषनास बसले होते.

लिंपणगाव येथील गट नंबर २८ व ३२ पैकी जमिनीत सामनेवाले आप्पा बुवाजी देवकाते वगैरे विरुद्ध श्रीगोंदा दिवाणी कोर्टचा दिवाणी दाव्यामध्ये दिनांक ८/४/२००२ रोजी कायम स्वरूपी मनाईहुकूम आदेश असताना, आदेश तोडून गैरकायदा मंडळी जमवून, जमिनीत बेकायदा घुसतात आणि अनेकवेळा तक्रारी दिल्या तरी गुन्हा दाखल होत नाहीत, फिर्याद घेण्यास नकार दिला जातो, सामनेवाले व पोलिस दोघांनी कोर्टाच्या हुकूमाचा अवमान केला, आमच्यावर दुहेरी अन्याय होत असून, पोलिस कर्तव्यात कसूर करतात,यासाठी सामनेवाले विरुद्ध दखलपात्र गुन्हे दाखल करा व दोषी पोलिसांवर कारवाई करावी.म्हणून,भाऊसाहेब तात्या देवकाते,सौ.संगीता बाळू देवकाते व त्यांचे कुटुंब हे उपोषणास बसले होते.

आढळगाव येथील गट नंबर ४१७ पैकी २० आर सन २००७ व ३४ आर जमीन सन २०१० मध्ये सामनेवाले शिंदेकडून रजिस्टर खरेदी केली.नोंदी झाल्या. मात्र,सामनेवाले आम्ही वयस्कर,गरीब, भोळसर असल्याचा गैरफायदा घेऊन, खंडणीसाठी जमिनीत बेकायदा घुसून,दिनांक २१/५/२०१९ पासून गुन्हे करत आहे.नांगरट करू देत नाहीत, ट्रॅक्टर अडवितात,बाबत वेळोवेळी तक्रारीत देतोत.तर,पोलिस भादवि कलम ४२७,४७,५०४,५०६ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल न करता,एन.सी. दाखल करतात आणि चौकशी सुद्धा करत नाहीत. ज्येष्ठ नागरिकांच्या फिर्याद न घेता, न्याय नाकारला जातो,जीव मुठीत धरून जगत आहोत, वरिष्ठ पोलीस अधिकारी व सरकारला तक्रारीत मिळूनही एक वर्ष झाले, गप्प का ? आजपर्यंत नुसकान झाले, जबाबदार कोण? पोलिस व सरकारने वाऱ्यावर सोडले. या अन्यायाविरुद्ध ज्येष्ठ नागरिक राजाराम किसन मिसाळ, सौ. मथुराबाई राजाराम मिसाळ हे त्यांचे प्रश्न घेऊन उपोषणास बसले होते.

म्हातार पिंपरी येथील स्टेशन ते पारगाव गेट हा जुना रस्ता काही शेतकऱ्यांनी एक वर्षापूर्वी बंद केला आहे.आम्ही शेतकऱ्यांनी दिनांक २८/८/२०१९ रोजी तहसीलदार श्रीगोंदा यांच्याकडे नवीन रस्ता मागणी अर्ज सादर केला होता.दिनांक ८/११/२०१९ रोजी स्थळ निरीक्षण झाले. परंतु,अद्याप पर्यंत कुठलाही आदेश या कारवाई झाली नाही.त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना शेतीत जाणे येणे बंद झाले व आमची उपासमार होत आहे.वारंवार संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊनही प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून,आम्ही सर्व शेतकरी आमरण उपोषणास बसत आहोत.आमच्या जीवितास बरे-वाईट झाल्यास, त्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची असेल.या प्रश्‍नी म्हातार पिंप्री येथील शेतकरी बांधव उपोषणास बसले होते.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading