दिनांक २६ मार्च २०२५,श्रीगोंदा (अहिल्यानगर:
श्रीगोंदा तहसीलदार श्रीमती क्षितीजा वाघमारे यांना शासकीय आदेशात अनियमितता केल्याच्या आरोपावरून महाराष्ट्र शासनाने निलंबित केले आहे. महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, एका संस्थेचे नाव बदलून खाजगी व्यक्तींना मालकी हक्क बहाल करण्याच्या प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शासकीय कर्तव्यात कसूर केल्याने महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ व शिस्त व अपील नियम १९७९ नुसार त्यांच्यावर विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर राहील व त्यांना शासन नियमानुसार निलंबन निर्वाह भत्ता मिळणार आहे. तसेच, त्यांना कोणतीही खाजगी नोकरी, व्यवसाय अथवा व्यापार करता येणार नाही.
या आदेशानुसार, श्रीमती वाघमारे यांनी पुढील आदेश येईपर्यंत मुख्यालय सोडू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
स्रोत:(आदेश)

आज मंत्रालयात श्री अनिल ठवाळ (जिल्हा परिषदेचे माजी सदस्य) तसेच ॲड.प्रदीप खामगळ व उमेश मखरे हे प्रशासकीय कामानिमित्त उपस्थित होते. यावेळी अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मा जिल्हा परिषद सदस्य, मा जिल्हा नियोजन समिती सदस्य अहिल्यानगर अनिल ठवाळ यांनी २६ मार्च रोजी निवेदन दिले..





Advertise..
