#श्रीगोंदा: ‘अवैध धंद्यांचा अड्डा’ ठरलेल्या पेडगाव रोडवरील हॉटेलवर कारवाई कधी? जेवणातून नशा .. अनं अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य.. शोषण..? पोलिसांची ‘संशयास्पद’ भूमिका.!

श्रीगोंदा, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५:

श्रीगोंदा शहरालगत असलेल्या पेडगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये अवैध आणि अश्लील कृत्यांचा नंगानाच सुरू असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. शहरापासून जवळच एका मंगल कार्यालयाच्या शेजारी हे हॉटेल सर्रासपणे आपला अवैध धंदा चालवत आहे, ज्यामुळे शहराच्या लौकिकाला आणि सुरक्षिततेला मोठा धोका निर्माण झाला आहे.

एका ताज्या घटनेच्या अनुषंगाने या हॉटेलमधील भयानक कारभार चव्हाट्यावर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या हॉटेलचा वापर अल्पवयीन मुलींना जेवणातून नशीले पदार्थ देऊन त्यांचे शारीरिक आणि लैंगिक शोषण करण्यासाठी केला जात आहे. ‘कॉलेज तरुण’ आणि ‘लिंग पिसाट’ प्रवृत्तीचे लोक या मुलींना जेवणाच्या नावाखाली अंमली पदार्थ देऊन त्यांना अश्लील कृत्यांसाठी बळी पाडत आहेत.

हॉटेलमध्ये प्रशासकीय नियमांना हरताळ फासत अल्पवयीन मुलींनाही सहज ‘एन्ट्री’ दिली जात असल्याचे नुकताच घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने या हॉटेलभोवती आता वादाचे मोठे वादळ उठले आहे.

या हॉटेलवर यापूर्वीही कारवाईची मागणी झाली होती, मात्र तत्कालीन स्थानिक पोलीस आणि काही पदाधिकाऱ्यांच्या मदतीने कारवाई होण्याऐवजी या अवैध धंद्याला बळ देण्यात आले. त्याचेच हे दुष्परिणाम आज सर्वांसमोर आले आहेत.

  • अल्पवयीन मुलींचे शारीरिक/लैंगिक शोषण.
  • जेवणाच्या नावाखाली नशीले पदार्थ देणे.
  • अवैध्य दारू विक्री.
  • नशीले पदार्थ विक्री.
  • लॉजिंगवर अश्लील कारस्थाने.

सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, श्रीगोंदा पोलीस प्रशासनाने मागील कित्येक महिन्यांपासून या हॉटेलचे आणि लॉजिंगचे रजिस्टर तपासलेच नाही, मात्र अहमदनगर पोलिसांनी ते तपासल्याचे समोर आले आहे.

यामुळे, या हॉटेलवर चालणाऱ्या अवैध्य दारू विक्री, नशीले पदार्थ विक्री आणि लॉजिंगवरील अश्लील कारस्थानांना श्रीगोंदा पोलिसांचा किती ‘हात’ आहे..? याच्या सखोल चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे.

शहरातील काही महाविद्यालयांच्या सुरक्षेवर आधीच प्रश्नचिन्ह असताना, आता हॉटेल्सवर चाललेल्या या असल्या उद्योगांमुळे पालकवर्गाने आपल्या पाल्यांवर अधिक लक्ष देणे गरजेचे झाले आहे.

हे पोलीस प्रशासन आणि महाविद्यालय प्रशासन  सर्व ‘उघड्या डोळ्यांनी’ बघत आहे आणि ‘कायद्याच्या चौकटीमागे दडत आहे’, हे श्रीगोंद्याचे दुर्दैव आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रशासनाने तातडीने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन सदर हॉटेलवर कठोर कारवाई करावी आणि अवैध धंद्यांना कायमस्वरूपी मूठमाती द्यावी, अशी मागणी श्रीगोंदा शहरातील सुज्ञ नागरिक आणि ऑल इंडिया पँथर सेना करत आहेत. अन्यथा लवकरच आंदोलन छेडण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

कालच्या या घटनेतील संशयित व्यक्ती येथील एका अकॅडमीचा विद्यार्थी असल्याचे बोलले जात असून, या गैर प्रकरणात नमूद हॉटेलचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट होत आहे.

स्रोत:(अधिकृत माहिती)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading