दिनांक ८ ऑक्टोबर २०२५:
सहकार क्षेत्रातील आर्थिक शिस्त आणि जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करत, कुकडी सहकारी साखर कारखान्याने (Kukadi Sahakari Sakhar Karkhana) Negotiable Instruments Act, 1881 च्या कलम १३८ अंतर्गत दाखल केलेल्या खटल्यात मोठा विजय मिळवला आहे.

मा. एच.जे.पठाण यांच्या न्यायालयाने दिनांक ०६/१०/२०२५ रोजी दिलेल्या महत्त्वपूर्ण न्यायनिर्णय नुसार, आरोपी सुभान मोहम्मद शेख यास दोषी ठरवून एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

न्यायालयाने आरोपी सुभान मोहम्मद शेख याला फौजदारी प्रक्रिया संहिता कलम २५५(२) नुसार खालील शिक्षा ठोठावली आहे:
- कारावास: एक वर्ष सश्रम कारावास (सक्तमजुरी).
- द्रव्यदंड (दंड): ₹१२,२१,६७६/- (रुपये बारा लाख एकवीस हजार सहाशे शेहयात्तर फक्त).
- दंडाचा उद्देश: हा द्रव्यदंड फिर्यादी कुकडी सहकारी साखर कारखान्यास नुकसानभरपाई म्हणून अदा केला जाईल.
- दंड न भरल्यास: जर आरोपीने द्रव्यदंड भरला नाही, तर त्यास दोन महिने साधा कारावास भोगावा लागेल.
न्यायालयाने आरोपीविरुद्ध तत्काळ कठोर कार्यवाहीचे आदेश दिले आहेत: - आरोपीचा जामीन जप्त (forfeit) करण्यात आला आहे.
- जामीनदारास तातडीने नोटीस जारी करण्यात यावी.
- आरोपीला पकडण्यासाठी स्टॅन्डिंग नॉन-बेलेबल वॉरंट (Non-Bailable Warrant – NBW) जारी करण्यात यावे.
कारखान्याचे कायदेविषयक काम पाहणारे ॲड. फाटे पी.जे. यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे युक्तिवाद करून कारखान्याच्या बाजूने यश मिळवले.

या संपूर्ण प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी कारखान्याचे माहितीगार इसम श्री. संदीप अरुण कोठारे आणि श्री. तुषार काकडे तसेच चीफ अकाउंटंट श्री. सरोदे साहेब यांनी आवश्यक ती सर्व कागदपत्रीय मदत पुरवत मोलाची भूमिका बजावली.

स्रोत:(प्रसिद्धी पत्र)
