जळू सारखं सामान्यांच रक्त पिणारी पोलीस यंत्रणा, गैरमार्गाने वळू सारख्या पोसनाऱ्या प्रक्रियेबाबत मूग गिळून गप्प का?…

दिनांक ५ डिसेंबर, श्रीगोंदा:

श्रीगोंदा पोलिसांच्या मदतीने तालुका कार्यक्षेत्रात अनधिकृत/अवैध धंद्यांचे पाळेमुळे वाढत चाललेली आहेत. पोलीस प्रशासन यासाठी सहकार्य करत असून, स्थानिक यंत्रणेच्या माध्यमांतूनच अनधिकृत उद्योग तालुका कार्यक्षेत्रात पोसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तालुका पदाधिकाऱ्यांच्या माध्यमांतून कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावातं चालू असलेल्या गैर उद्योगांची यादी तयार करण्याचे कामं संघटनेने हाती घेतले आहे. असे पँथरने माध्यमांना सांगितले आहे.

वाढणारे अवैध धंदे आणि प्रशासनाची उदासीनता यामुळे तालुक्यात सर्वत्र अफरातफर आणि अनागोंदीचा कारभार दिसू लागला आहे. स्थानिक पोलीस प्रशासन अवैध धंद्यांना पाठबळ देत असल्याचे ऑल इंडिया पँथर सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष अमर घोडके यांनी निवेदनात म्हटले आहे.

पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंद्यांचा उच्चांक झाला आहे. तालुक्यातील अनेक गावांत, वाड्या – वस्त्यापर्यंत या व्यवसायांची पाळेमुळे वाढलेली आहेत. या सर्व प्रक्रियेला पोलीस प्रशासनच ताकत देत असून, अनेक ठिकाणी असंख्य अनधिकृत व्यवसाय प्रशासनाच्या वरदहस्ताने बळकट होत चालले आहेत.

अवैध धंद्यातुन श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असून, पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी स्वतंत्र यंत्रणेमार्फत येथील या गैरबाबी पडताळून घ्याव्यात. तालुक्यात बहुतांश कार्यकर्ते अवैध धंद्याची माहिती देण्यास तयार असून, आपण स्वतः यात पुढाकार घेऊन, येथे कारवाई करावी. असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

अवैध धंद्यामार्फत पोसलेली ही यंत्रणा पोलिसांच्या पाटराखणीमुळे तक्रार करणाराला अडचणी निर्माण करते. “तक्रार करेल तो मरेल” अशा पद्धतीने तालुक्यात गुन्हेगारी वृत्तीच्या गुंडांची दहशत पसरवली जात आहे. मात्र, ऑल इंडिया पँथर सेना याला भीक घालणार नाही. आपल्या स्थानिक प्रशासनाने कारवाई करावी.. अन्यथा, ऑल इंडिया पँथर सेना लवकरच स्वतःच्या यंत्रणेमार्फत तालुक्‍यातील अवैध धंदे रोखण्यासाठी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी व मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांपर्यंत सदर प्रकाराचा पाठपुरावा करणार असल्याचे नमूद केले आहे.

तालुका कार्यक्षेत्रातील पोलिस स्टेशनचे बीट मार्शल व ठाणे अंमलदार यांना या सर्व गोष्टींची कल्पना आहे. परंतु, त्यांच्या जाणीवपूर्वक दुर्लक्षामुळे अवैध धंदे चालवणाऱ्यांशी हितसंबंध जोपासल्याचे स्पष्ट होत आहे. याचीही पोलीस अधीक्षकांनी चौकशी करावी. ज्या ठिकाणी अनधिकृत व्यवसाय चालू आहेत. त्या कार्यक्षेत्रातील बीट अंमलदारावरच कारवाई करण्यात यावी. जेणेकरून या सर्व प्रक्रियेला आळा बसेल. असेही त्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे.

तालुक्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलनाची घोषणा, नुकत्याच होणाऱ्या बैठकी नंतर जिल्हा पदाधिकारी करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. Shrigonda .. Why the police system, which drinks the blood of the common people like leprosy, is silent about the process of feeding like bulls in a wrong way? …

एकंदरच श्रीगोंदा तालुका कार्यक्षेत्रात अनेक प्रकरनांत सामान्यांच जळू सारखं रक्त पिणारी पोलीस यंत्रणा, गैरमार्गाने वळू सारख्या पोसनाऱ्या प्रक्रियेबाबत मूग गिळून गप्प का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्रोत: (पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांना सादर केलेले निवेदन)

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading