श्रीगोंदयात असे विचित्र घडले असल्यास.? गंभीर वास्तव येईल समोर…!

दिनांक ३ डिसेंबर, श्रीगोंदा:

तालुक्यातील एका गावात भटके – विमुक्त समाजाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याची शासंक माहिती सामाजिक प्रक्रियेत सक्रिय कार्यकर्त्यांकडून समजली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्याच्या पश्चिम भागात साखर कारखाना असलेल्या गावात भटके-विमुक्त समाजाच्या एका अल्पवयीन मुलीचे तिच्या आईला सोन्याचे दागिने घेण्यासाठी लागणारे पैसे उपलब्ध व्हावेत म्हणून, लग्न लावून दिले आहे.

या घटनेबाबत सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी सामाजिक माध्यमांतुन जाहीर केलेल्या माहितीनंतर स्थानिक कार्यकर्ते व प्रशासनास या प्रकरणी माहिती मिळाली आहे. प्रशासनाला माहिती मिळताच सदरील घटनेची वास्तव परिस्थिती तपासण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सक्रिय झाली आहे.

सविस्तर असे की, बेलवंडी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या गावातील भटके – विमुक्त समाजाच्या दाम्पत्याने स्वतःच्या आर्थिक गरजेला भागवण्यासाठी वयात नसलेल्या पोटच्या पोरीचे समाजातील एका मुलाशी लग्न लावून दिल्याचे निदर्शनास आल्याचे सामाजिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या प्रकरणी बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व चाईल्ड लाईनचे पदाधिकार्‍यांना फोन करून माहिती देण्यात आली आहे. स्थानिक पोलीस यंत्रणा, पंचायत समितीच्या महिला व बालकल्याण समितीचे पदाधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, विस्तार अधिकारी नमूद प्रकरणी चौकशी करत आहेत. लवकरच या प्रकरणी आरोपी आई-वडिलांवर स्थानिक पोलिस प्रशासन कारवाई करील. अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तालुक्यात असे विवाह प्रकरण घडत असतील.! तर, यातून गंभीर वास्तव परिस्थिती समोर येणार आहे. हे मात्र नक्की..!!

स्त्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)

प्रतिकात्मक फोटोचा वापर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Discover more from

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading