श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालय श्रीगोंदाचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश.

दिनांक ३ फेब्रुवारी, श्रीगोंदा:

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून नुकत्याच झालेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवीचा निकाल जाहीर करण्यात आला. अत्यंत कठीण अशा परीक्षेमध्ये विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये एकूण ६ विद्यार्थिनी व पूर्व माध्यमिक इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत ४ विद्यार्थ्यांनी अशा एकूण १० विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवत्ता धारक विद्यार्थिनी पूर्वा रणसिंग, स्वरांजली दरेकर, ज्ञानदा शेंडे, क्षितिजा शेलार, धनश्री लवांडे व सृष्टी शेलार यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

या विद्यार्थिनींना विभाग प्रमुख श्री शेवाळे एम् एन, श्रीमती वाकचौरे एस.व्ही., श्रीमती जाधव एस.डी., श्रीमती घोडे पी. बी., श्रीमती आनंदकर सी.डी. श्री उदार सी.के, श्रीमती राऊत एस.डी. यांचे मार्गदर्शन लाभले.

तसेच इयत्ता आठवी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थीनी भक्ती जाधव, यशश्री मखरे, अनुष्का सातपुते, रिया ठोकळ यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली.

या यशस्वी विद्यार्थिनींना विभाग प्रमुख श्री गवळी ए. आर., श्री. कुंदन खामकर, श्री शिंदे के.डी., श्री खेतमाळीस एन.पी., श्रीमती सूर्यवंशी आर.डी. यांचे मार्गदर्शन लाभले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे आमदार बबनरावजी पाचपुते, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य बाबासाहेब भोस, जनरल बॉडी सदस्य कुंडलिकराव दरेकर, जनरल बॉडी सदस्य बाजीराव कोरडे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.वंदना नगरे, उपमुख्याध्यापिका सौ. गीता चौधरी, पर्यवेक्षक श्री बोराडे गोरखनाथ, गुरुकुल प्रमुख श्री राजेंद्र खेडकर, ज्येष्ठ शिक्षक श्री वसंत दरेकर यांनी अभिनंदन केले.

स्रोत:(प्रसिद्धीपत्र)

Leave a Reply