दिनांक ९ एप्रिल, श्रीगोंदा:
तालुक्यातील या प्रशासकीय कार्यालयात बहुतांश कामं अनधिकृत पद्धतीने चालत असलेने काही पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या कार्यपद्धतीचे बिंग फुटु नये, या उद्देशाने हप्ते दिले जात असलेबाबत माहिती समजली आहे. पत्रकारितेच्या नावाखाली पैसे उकळणाऱ्या या तोतय्या पत्रकारांमुळे पत्रकारिता क्षेत्र तालुक्यात बदनाम होत चालले आहे. पत्रकारीतेच्या कोणत्याही डिग्री व प्रमाणपत्र नसताना सामान्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना, वकिलांना धमकावणे व मलिदा गोळा करणे अश्या गैर कारभारामुळे या पत्रकारांच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.(Some journalists and social workers get installment in this administrative office.?)

शहरातील शनि चौक परिसरात पोलिस स्टेशन कार्यक्षेत्राच्या जवळ असलेल्या एका कार्यालयामध्ये दर सोमवारी हा व्यवहार आटोपला जात असल्याची चर्चा समोर येत आहे. या कार्यालयामध्ये तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लोकं येत असून, नमूद ठिकाणी मोठी आर्थिक उलाढाल होत असते. या प्रशासकीय प्रक्रियेमध्ये काही चुकीच्या पद्धतीने कारभार चालत असल्याने, स्वतःस दक्ष समजणाऱ्या काही पत्रकारांचे या कार्यालयातील गैरकारभारावर लक्ष असते. त्यामुळे नमूद प्रशासकीय अधिकारी दर सोमवारी हप्ता बांधून त्यांचे तोंड बंद करत असलेबाबत चर्चा सार्वत्रिक ऐकण्यात येत आहे.

नेमके हे प्रशासकीय कार्यालय कोणते ? हे अनेकांना समजून आले असेल. मात्र, काही पत्रकारांच्या व सामाजिक कार्यकर्त्यांच्या चुकीच्या वृत्तीमुळे पत्रकारिता सह समाजकार्य बदनाम होत असून, पत्रकारिता हा व्यवसाय करू पाहणाऱ्या या टवाळखोरांना याबाबत प्रशासनाने चाप देणे गरजेचे झाले आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारही देणार असल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी पाठपुरावा करत असल्याचे त्यांचे मत आहे.
स्रोत:(मिळालेल्या माहितीनुसार)
