दिनांक १७ मार्च २०२५, श्रीगोंदा,अहिल्यानगर:
समलैंगिक संबंध उघडकीस येण्याच्या भीतीने दोन तरुणांनी मिळून माऊली गव्हाणे यांची क्रूर हत्या केली. आरोपींनी त्यांचे दोन्ही हात, पाय आणि मुंडके कापून वेगवेगळ्या पोत्यात भरून विहिरीत फेकले. या घटनेने शिरूर, श्रीगोंदा आणि अहिल्यानगर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी सागर दादाभाऊ गव्हाणे (वय २०, रा. दाणेवाडी, ता. श्रीगोंदा) याला ताब्यात घेतले असून, एक अल्पवयीन आरोपीदेखील या गुन्ह्यात सहभागी असल्याचे समोर आले आहे. माऊली गव्हाणे यांनी आरोपींच्या समलैंगिक संबंधांची माहिती बाहेर सांगितल्यास बदनामी होईल, या भीतीतून त्यांचा खून करण्यात आला. अहिल्यानगर पोलिसांनी गुन्ह्याची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
स्रोत:(ऑनलाईन वृत्त)




Advertise..
